शहरं
Join us  
Trending Stories
1
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
2
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
3
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
7
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
8
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
9
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
10
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
11
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
12
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
13
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
14
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
15
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
16
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
17
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
18
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
19
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
20
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

NIA raids, Gangsters on Hit List: टेरर फंडिंगविरोधात NIA 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; सात राज्यांत ७० हून अधिक छापे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 14:35 IST

पहाटे ५ वाजल्यापासून धाडसत्र सुरू, टेरर फंडिंगशी संबंधित गँगस्टर्सवर कारवाई

NIA raids, Gangsters on Hit List: राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयए ही टेरर फंडिंग प्रकरणी मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे. एनआयएने दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि गुजरातसह सात राज्यांमध्ये एकाच वेळी ७० हून अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत. टेरर फंडिंगशी संबंधित असलेल्या गुंडांवर ही कारवाई करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआयच्या चौकशीत अनेकांची नावे समोर आली आहेत. एनआयएला तपासात काही पुरावेही मिळाले आहेत. एनआयएने छापे घातलेल्या गुंडांमध्ये लॉरेन्स बिश्नोईचा साथीदार कुलविंदर आणि पीलीभीतमधील दिलबाग सिंग या नावांचाही समावेश असल्याचे बोलले जात आहे.

पहाटे ५ वाजल्यापासून सुरू आहे छापेमारी

पहाटे पाच वाजल्यापासून एनआयएची छापेमारी सुरू आहे. गुंडांच्या या रॅकेट विरुद्ध एनआयएचा हा चौथा छापा आहे. एनआयच्या या छाप्यात कॅनडामध्ये दहशत पसरवणाऱ्या आणि मूळचा पंडाबचा असणारा लखबीर लांडा याच्या व्यतिरिक्त गँगस्टर लॉरेन्स आणि गोल्डी ब्रारच्या जवळच्या नातेवाईकांवर छापेमारी करण्यात आली असल्याची माहिती आहे. एनआयने काही दिवसांपूर्वी लखबीर लांडाला दहशतवादी घोषित केले आहे. तेव्हापासून त्याच्या जवळच्या नातेवाईकांवर सतत नजर ठेवण्यात येत आहे.

एकूण ७०हून अधिक ठिकाणी छापे

एनआयएने पंजाबमधील तरनतारन आणि फिरोजपूरमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. याशिवाय उत्तर प्रदेशातील प्रतापगड आणि पिलीभीतमध्ये छापे टाकण्यात आले आहेत. हरियाणात मोहनपूर गावात गँगस्टर सुरेंद्र उर्फ ​​चीकू आणि नारनौलच्या सेक्टर-1 मधील त्याच्या एका नातेवाईकाच्या घरावर छापे टाकण्यात आले आहेत. याशिवाय गुजरात आणि राजस्थानमध्येही अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.

टॅग्स :NIAराष्ट्रीय तपास यंत्रणाTerrorismदहशतवादraidधाडPunjabपंजाबHaryanaहरयाणाGujaratगुजरात