शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
5
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
6
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
7
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
8
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
9
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
10
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
11
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
12
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
13
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
14
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
15
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
16
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
17
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
18
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
19
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!

Maharashtra Politics: चूक भोवली! निवडणूक आयोगाने अडीच लाख प्रतिज्ञापत्र बाद ठरवली; उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2022 12:27 IST

Maharashtra News: केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार कोसळले आणि नवे शिंदे-फडणवीस स्थापन झाले. यानंतर शिंदे गटाने आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा करत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. यानंतर शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गोठवण्यात आले. तसेच निवडणूक आयोगाने काही कागदपत्र सादर करण्यास सांगितले होते. बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने लाखो प्रतिज्ञापत्र सादर केली. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाची तब्बल अडीच लाख प्रतिज्ञापत्र बाद ठरवल्याची माहिती देण्यात आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही गटाकडून शिवसेना ही आमचीच आहे हे सिद्ध करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून दोन ट्रक भरून प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली. ठाकरे गटाने ११ लाख प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली होती, असे सांगितले जात आहे. 

प्रतिज्ञापत्रात चूक झाल्याने बाद ठरवली

निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या विहीत नमुण्यामध्येच ही प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक होते. शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांकडून विहीत नमुण्यामध्ये प्रतिज्ञापत्र सादर न करण्यात आल्याने प्रतिज्ञापत्र बाद ठरवण्यात आली आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने बाद ठरवलेल्या प्रतिज्ञापत्रांची संख्या तब्बल अडीच लाख असल्याचे सांगितले जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रतिज्ञापत्र बाद होणे हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. 

दरम्यान, खरी शिवसेना कोणाची आणि शिवसेनेचं चिन्ह असलेलं धनुष्यबाण हे चिन्ह कोणाचे यावरून ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये वाद सुरू आहे. दोन्ही गटाकडून धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना या नावावर दावा करण्यात आल्याने निवडणूक आयोगाकडून चिन्हासह शिवसेना हे नाव गोठवण्यात आले आहे.  त्यामुळे आता पुढील आदेश येईपर्यंत दोन्ही गटाला शिवसेना हे नाव आणि चिन्ह वापरता येणार नाही.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना