शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : "सरकार स्थापन झालं तर खटा-खट, खटा-खट पैसे..."; राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं
2
मतदानानंतर मोहन आगाशेंची राजकारणावर टिप्पणी, म्हणाले - "पाच मिनिटं मशीन वाचण्यात गेली..."
3
निलेश लंके हे सोशल मीडियाने निर्माण केलेलं वादळ, खरा चेहरा समोर आला; राधाकृष्ण विखेंचा हल्लाबोल
4
पराभव समोर दिसू लागल्यानं खापर फोडण्याचं काम सुरू केलंय; सामंतांचा राऊतांना टोला
5
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये ७-८ बॅगा; त्यात ५०० सफारी, सूट होते का? संजय राऊतांचा आरोप
6
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.45 टक्के मतदान झाले
7
पाकिस्तान विरूद्ध आयर्लंड मालिका म्हणजे क्लब क्रिकेट; PCB च्या माजी अध्यक्षाची टीका
8
PAK vs IRE: पहिल्या पराभवानंतर पाकिस्तानने लाज राखली; आयर्लंडची कडवी झुंज!
9
संविधान बदलण्याचं काम नेहरू-इंदिरा अन् राजीव गांधींनीच केलंय; नरेंद्र मोदींचा पलटवार
10
राज ठाकरे सुपारीबाज, ही गर्जना भाजपानेच केली, आम्ही नाही; संजय राऊतांचा पलटवार
11
'१९४७ मध्ये धर्माच्या आधारावर पाकिस्तान बनला, मग भारत हिंदू राष्ट्र का नाही बनला?' कंगना राणौतचा सवाल
12
Sonia Gandhi : Video - "महिलांना एक लाख देणार"; लोकसभा निवडणुकीदरम्यान सोनिया गांधींची मोठी घोषणा
13
पाथर्डीत मतदान कर्मचाऱ्यांकडेच सुजय विखे पाटील यांची प्रचार पत्रके, ग्रामस्थांचा आक्षेप
14
Shares to Pick : घसरत्या बाजारातही 'या' शेअर्सवर एक्सपर्ट बुलिश, कोणते आहेत 'हे' Stocks?
15
Narendra Modi : उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला किती जागा मिळतील?; पंतप्रधान मोदींनी केला मोठा दावा
16
अणुबॉम्बच्या भीतीने पीओके जाऊ द्यायचे का? मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावर अमित शहांचे प्रत्युत्तर
17
Maharashtra Lok Sabha Election 2024 मराठी कलाविश्वातील या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, चाहत्यांनाही केलं आवाहन
18
मतदान केंद्रावर गेली पण मतदानच करता आलं नाही, सावनी रविंद्रबरोबर नेमकं काय घडलं?
19
निकालानंतर पुन्हा भाजपासोबत जाणार का?; राऊतांचा प्रश्न अन् उद्धव ठाकरेंचं सडेतोड उत्तर
20
Tata Motors चे शेअर्स जोरदार आपटले, ८ टक्क्यांची घसरण; Q4 निकालांमुळे गुंतवणूकदार नाराज

बंगळुरू कॅफे स्फोट प्रकरणात मोठा खुलासा, संशयिताने बसमधून प्रवास केला, वाटेत कपडेही बदलले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2024 8:07 AM

बंगळुरूमध्ये रामेश्वरम कॅफेमध्ये १ मार्च रोजी स्फोट झाला होता. या प्रकरणी एनआयएने तपास सुरू केला आहे. याप्रकरणी नवनवीन खुलासे होत आहेत.

बंगळुरूमध्ये रामेश्वरम कॅफेमध्ये १ मार्च रोजी स्फोट झाला होता. या प्रकरणी एनआयएने तपास सुरू केला आहे. याप्रकरणी नवनवीन खुलासे होत आहेत. १ मार्च रोजी दुपारी १२.५६ वाजता झालेल्या कॅफे बॉम्बस्फोटातील एक संशयित स्फोटानंतर जवळपास आठ तासांनंतर रात्री ८.५८ वाजता बल्लारी बसस्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसला. बुधवार, ६ मार्च रोजी, स्फोटानंतर पाच दिवसांनी, एनआयएने बल्लारी येथील 'ISIS मॉड्यूल'मधून चार जणांना ताब्यात घेतले.

राहुल गांधी यांची नवी रणनीती; विजयश्री खेचण्यासाठी युती जास्त, जागा कमी, काँग्रेस लढवणार ३०० जागा

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे मिनाज उर्फ ​​मोहम्मद सुलेमान, २६, अनस इक्बाल शेख, २३, शायन रहमान उर्फ ​​हुसेन, २६ तर १९ वर्षीय सय्यद समीरला चौकशीसाठी तीन दिवसांसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. कॅफे स्फोटातील संशयित, या आरोपीचा पलायनाचा मार्ग सीसीटीव्ही फुटेजद्वारे शोधण्यात आला होता, तो दोन आंतरराज्य सरकारी बसेसमधून बल्लारी आणि अन्य अज्ञात ठिकाणी गेल्याचे दिसत आहे.

संशयिताने पलायन केलेल्या मार्गाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो कॅफेच्या अगदी जवळ असलेल्या बस स्टॉपवरून व्होल्वो बस (KA 47 F 4517) मध्ये चढताना दिसतो. संशयिताने कॅफेपासून सुमारे ३ किमी दूर कपडे बदलले, तिथे त्याने घातलेली बेसबॉल कॅप आणि शर्ट काढला आणि कॅज्युअल टी-शर्टमध्ये बदलला.

घटनास्थळावरून बेसबॉल कॅप जप्त करण्यात आली असून हा या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा असल्याचे पोलिसांनी सांगितले. स्फोटाच्या दिवशी दुपारी ३ च्या सुमारास बेंगळुरूच्या बाहेरून शहरापासून ६० किमी अंतरावर असलेल्या तुमकूरला निघालेल्या सरकारी बसमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित देखील दिसला. बसमध्ये लावलेल्या कॅमेऱ्यात टोपीशिवाय आणि नवीन कपड्यातील संशयितांचे फोटो कैद झाल्याचे सूत्रांनी सांगितले. तुमकूरला जाताना तो बसमधून खाली उतरल्याचे या व्हिडीओत दिसत आहे.

टॅग्स :BengaluruबेंगळूरPoliceपोलिसNIAराष्ट्रीय तपास यंत्रणा