मोठी बातमी! आजपासून मिळणार रेल्वेची Tatkal Ticket बुकिंग सेवा; असं करा तिकीट बुक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 10:55 AM2020-06-29T10:55:32+5:302020-06-29T10:56:12+5:30

मध्य रेल्वेच्या पीआरओ शिवाजी सुतार यांच्या माहितीनुसार ही सुविधा 30 जून आणि त्या नंतरच्या तारखेला धावणा-या गाड्यांसाठी सुरू होईल. 

Big news! tatkal ticket booking railway commence tatkal booking will from 29 june in all special trains | मोठी बातमी! आजपासून मिळणार रेल्वेची Tatkal Ticket बुकिंग सेवा; असं करा तिकीट बुक

मोठी बातमी! आजपासून मिळणार रेल्वेची Tatkal Ticket बुकिंग सेवा; असं करा तिकीट बुक

Next

नवी दिल्ली : देशभरातील २०० विशेष ट्रेन आणि देशातील निवडक १५ मार्गांवरून राजधानी ट्रेन धावत आहे. या ट्रेनचे २९ जूनपासून तत्काळ तिकीट मिळण्यास सुरुवात झाली आहे. प्रवासी ३० जूनच्या प्रवासाचे तिकीट आरक्षित करू शकतात, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २२ मार्चपासून रेल्वेची प्रवासी वाहतूक बंद आहे. पण सध्या निवडक १५ मार्गांवर राजधानी विशेष ट्रेन तर आणि १ जूनपासून २०० स्पेशल ट्रेन चालविण्यात येत आहेत. भारतीय रेल्वेने कोरोना संकटात रेल्वे प्रवाशांसाठी तात्काळ तिकीट बुकिंग सेवा सुरू केली आहे. रेल्वेने चालविलेल्या विशेष प्रवासी गाड्यांमध्ये आणि एसी स्पेशल ट्रेन्समध्ये तत्काळ तिकिट बुकिंगची सेवा आजपासून सुरू झाली आहे. मध्य रेल्वेच्या पीआरओ शिवाजी सुतार यांच्या माहितीनुसार ही सुविधा 30 जून आणि त्या नंतरच्या तारखेला धावणा-या गाड्यांसाठी सुरू होईल. 

तात्काळ तिकिट बुकिंग केव्हा सुरू होईल? 
रेल्वे प्रवासी 30 जूनपासून प्रवासासाठी तत्काळ तिकिट सुविधेचा लाभ घेऊ शकतील. तत्काळ तिकिटे एसी क्लाससाठी सकाळी 10 पासून आणि सकाळी 11 पासून स्लीपर क्लाससाठी बुक केली जातील. 12 ऑगस्टपर्यंत सर्वसामान्य रेल्वेसेवा बंद करण्यात आल्या आहेत. याबाबत गुरुवारी भारतीय रेल्वेने आदेश दिला आहे. मेल आणि एक्सप्रेस गाड्यांसह सर्व सामान्य प्रवासी सेवा गाड्या 12 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत, असे या आदेशात म्हटले आहे. नवीन ऑर्डरवरून हे स्पष्ट झाले आहे की ,12 ऑगस्टपर्यंत आता फक्त विशेष गाड्या चालवता येतील.



आता तात्काळ तिकीट कसे आणि केव्हा मिळेल? 
जर तुम्हाला द्वितीय श्रेणी किंवा स्लीपरसाठी तत्काळ तिकिटे बुक करायची असतील तर याची वेळ सकाळी 11 वाजता आहे. एसी तिकिटांसाठी बुकिंगची वेळ सकाळी 10 वाजता आहे. काही मिनिटांत किंवा बर्‍याच वेळा, तिकिटे सेकंदात संपतात. अशा परिस्थितीत आपण वेळेवर लॉग इन करणे किंवा काऊंटरपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे. या नियमात बदल केल्याबद्दल रेल्वेकडून अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही, म्हणूनच आम्ही तुम्हाला आधीपासूनच सुरू असलेल्या नियमांबद्दल सांगत आहोत. तत्काळ तिकीट केव्हा बुक केले जाते, याबद्दल प्रवाशांमध्ये अनेकदा संभ्रम निर्माण होतो. समजा तुम्हाला 30 जूनला प्रवास करायचा असेल तर तुम्हाला तिकीट एक दिवसाआधीच म्हणजे 29  जून रोजी सकाळी १० किंवा अकरा वाजता बुक करावे लागेल. तत्काळ तिकिटांच्या बुकिंगवर तुम्हाला आणखी एक गोष्ट लक्ष देण्याची गरज आहे, ती म्हणजे तुमच्या प्रवासादरम्यान आयडी असणे आवश्यक आहे. बरेच प्रवासी एकत्र असल्यास त्यातील एकाचा आयडी पुरेसा असेल, पासपोर्ट, आधार कार्ड, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र, केंद्र किंवा राज्य शासकीय कर्मचारी म्हणून ओळखपत्र, रेल्वे प्रवासादरम्यान बँक पासबुक, शाळा किंवा महाविद्यालय आयडी वैध असेल.  तत्काळ तिकीट रद्द केल्यास परतावा मिळणार नाही. संपूर्ण रक्कम रेल्वेमधून वजा केली जाते. ट्रेन रद्द झाल्यास तुम्हाला संपूर्ण पैसे परत मिळतील.

हेही वाचा

India China Faceoff: ...म्हणून भारत चीनसोबत आरपारच्या लढाईच्या पर्यायासाठी तयार

पेट्रोल अन् डिझेलचे भाव पुन्हा भडकले, जाणून घ्या आजचे दर

CoronaVirus: कोरोनाची तीन नवीन लक्षणं आली समोर, CDCने अपडेट केली यादी

जवानांसोबतच्या चकमकीत ३ दहशतवाद्यांचा खात्मा, जून महिन्यातच ३८ अतिरेक्यांना केलं ठार

आजचे राशीभविष्य - 29 जून 2020; 'या' राशीच्या व्यक्तींना आज जीवनसाथी मिळणार

Read in English

Web Title: Big news! tatkal ticket booking railway commence tatkal booking will from 29 june in all special trains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.