शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! आर्मी कॅंपवर भूस्खलन, 7 जवानांचा मृत्यू तर 30 ते 40 अजूनही मातीखाली अडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 15:15 IST

मणिपूर राज्यामध्ये अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटना समोर येत आहेत.

इंफाळ: मणिपूर राज्यामध्ये अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटना समोर येत आहेत. नोनी जिल्ह्यातील तुपुल रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी रात्री 107 प्रादेशिक लष्करी(टेरिटोरियल आर्मी) छावणी भूस्खलनाच्या तडाख्यात आली. या अपघातात 30-40 जवान मातीत गाडले गेले.

7 जणांचा मृत्यूमीडिया रिपोर्ट्सनुसार, या घटनेत आतापर्यंत 7 जवानांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर 13 जवानांना वाचवण्यात यश आले आहे. 30-40 पेक्षा जास्त अजूनही मातीखाली असल्याची माहिती आहे. मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी याबाबत तातडीची बैठक बोलावली आहे. जखमींच्या मदतीसाठी डॉक्टरांचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे.

सर्वसामान्यांनाही फटकाजखमींना नोनी आर्मी मेडिकल युनिटमध्ये उपचारासाठी आणण्यात आले आहे. दरड कोसळल्याने इझाई नदीच्या प्रवाहावर परिणाम झाला आहे. ही नदी तामेंगलाँग आणि नोनी जिल्ह्यातून वाहते. वृत्तानुसार, काही नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, लष्कराचे हेलिकॉप्टरही घटनास्थळी पोहोचले आहे. पण, खराब हवामानामुळे बचाव मोहिमेत अडचणी येत आहेत. 

या भागात विनाशाचा धोकाजिल्हा प्रशासनाने जवळच्या गावकऱ्यांना खबरदारी घेण्याचा आणि लवकरात लवकर जागा रिकामी करण्याचा सल्ला दिला आहे. मातीमुळे इजाई नदीचे पाणी एकाच ठिकाणी साचले आहे, यामुळे धरण सदृश्य परिस्थितीही निर्माण झाली आहे. तो फुटला तर सखल भागात आणखी विध्वंस होण्याची शक्यता आहे. आसाम, मणिपूरसह अनेक ईशान्येकडील राज्यांमध्ये संततधार पावसाने पूरस्थिती निर्माण केली आहे. आसाममध्ये 10 दिवसांत आतापर्यंत 135 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर लाखो लोक बाधित झाले आहेत. हवामान खात्यानुसार, अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर आणि सिक्कीममध्ये आणखी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :landslidesभूस्खलनDeathमृत्यूRainपाऊस