शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी: देशभरात 'एस्मा' लागू! इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा निर्णय; आंदोलनांवर बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 11:52 IST

ESMA implemented nationwide: इराण-इस्रायल युद्धामुळे भारतात इंधन टंचाईची भीती. केंद्र सरकारने देशभर ESMA कायदा लागू केला. गॅस आणि पेट्रोल पुरवठा विस्कळीत करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई. वाचा सविस्तर.

मध्य आशियातील वाढत्या तणावाचे पडसाद आता भारताच्या इंधन पुरवठ्यावर उमटू लागले आहेत. एलपीजी सिलिंडर आणि पेट्रोलियम उत्पादनांची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने आजपासून संपूर्ण देशात 'एस्मा' म्हणजेच 'अत्यावश्यक सेवा देखभाल कायदा' लागू केला आहे. याचबरोबर युद्धजन्य परिस्थितीमुळे जेव्हा एखाद्या वस्तूचा पुरवठा विस्कळीत होतो, तेव्हा बाजारात त्या वस्तूची साठेबाजी आणि काळाबाजार वाढण्याची शक्यता असते. हे रोखण्यासाठी सरकार या कायद्याचा आधार घेते.

या कायद्यामुळे इंधन पुरवठ्याशी संबंधित असलेले कर्मचारी आता कोणत्याही प्रकारचे आंदोलन किंवा संपावर जाऊ शकणार नाहीत. यामुळे गॅस आणि पेट्रोलचा पुरवठा विस्कळीत होणार नाही याची खात्री सरकारला करता येईल. सरकार कोणत्याही वस्तूचा साठा, वितरण आणि विक्रीवर मर्यादा घालू शकते. सध्या एलपीजी बाबत हेच घडत आहे. व्यापारी किंवा विक्रेते जास्त नफ्यासाठी गॅस सिलिंडरचा साठा करून ठेवू शकत नाहीत. तसे आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होतो. सरकार जीवनावश्यक वस्तूंची कमाल विक्री किंमत निश्चित करू शकते, जेणेकरून टंचाईच्या काळात ग्राहकांची लूट होणार नाही.

अत्यावश्यक सेवांचा दर्जाएलपीजी वितरण, पेट्रोल पंप आणि तेल कंपन्यांच्या कामाला 'अत्यावश्यक सेवा' म्हणून घोषित करण्यात आले आहे. कामावर येण्यास नकार देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर या कायद्यांतर्गत कठोर कारवाई किंवा अटक केली जाऊ शकते. युद्धामुळे कच्च्या तेलाची आवक कमी झाली असताना, देशांतर्गत उपलब्ध असलेल्या साठ्याचे वितरण समान पद्धतीने व्हावे, हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे.

जनतेवर काय परिणाम होणार?सरकारने हा निर्णय सामान्य जनतेच्या सोयीसाठी घेतला आहे, जेणेकरूनरुग्णालये आणि घरगुती वापरासाठी लागणारा गॅस वेळेवर उपलब्ध होईल. मात्र, टंचाईच्या अफवा पसरवून साठेबाजी करणाऱ्यांवरही आता सरकारची करडी नजर असणार आहे. तेल कंपन्यांना इतर उत्पादने कमी करून केवळ एलपीजी उत्पादनावर भर देण्याचे आदेश या कायद्यांतर्गत दिले गेले आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Nationwide 'ESMA' Implemented Amid Fuel Crisis; Protests Banned

Web Summary : Amid fuel supply concerns due to Middle East tensions, the government implements ESMA nationwide. This restricts fuel-related employee strikes and prevents hoarding of essential commodities. The government aims to ensure stable gas and petrol distribution, setting maximum prices and preventing exploitation during shortages, prioritizing public convenience and essential services like LPG.
टॅग्स :IranइराणCentral Governmentकेंद्र सरकारWarयुद्धPetrolपेट्रोलDieselडिझेल