शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

मोठी बातमी: नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची ईडीकडून चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 13:56 IST

Mallikarjun Kharge News: गेल्या काही दिवसांपासून ईडीच्या कारवायांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. दरम्यान आज नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची चौकशी सुरू केली आहे.

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून ईडीच्या कारवायांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. दरम्यान आज  नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची चौकशी सुरू केली आहे. ईडीने खर्गे यांना नोटीस पाठवून सोमवारी चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले होते. त्यानुसार आज सकाळी ११ वाजता खर्गे हे ईडीच्या कार्यालयात पोहोचले. नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी आरोपी आहेत. नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये ईडीने कथित आर्थिक अनियमितांची चौकशी सुरू केली आहे.

यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेडने काँग्रेसवर असोसिएट्स जर्नल्स लिमिटेडच्या अधिग्रहणामध्ये फसवणूक, कटकारस्थान आणि गुन्हेगारी विश्वासघाताचा आरोप केला आहे. काँग्रेसचे मुखपत्र नॅशनल हेराल्डची सुरुवात माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी केली हो. या इंग्रजी वर्तमानपत्राचे प्रकाशन असोसिएट्स जर्नल लिमिटेडकडून केलं जात होतं.

२०१० मध्ये आर्थिक अडचणींचा सामना करत असलेल्या एजेएलचे अधिग्रहण यंग इंडियन प्रा.लि. नावाच्या एका नवनिर्मित कंपनीने केले होते. सुमन दुबे आणि सॅम पित्रोदा हे वायआयएलचे संचालक होते. जवाहरलाल नेहरूंनी १९३७ मध्ये असोसिएटेड जर्नलची स्थापना केली होती. त्यामधून तीन वर्तमानपत्रे सुरू करण्यात आली. हिंदीमध्ये नवजीवन, उर्दूमध्ये कौमी आवाज आणि इंग्रजीमध्ये नॅशनल हेराल्ड. मात्र २००८ मध्ये असोसिएटेड जर्नलने वृत्तपत्रे प्रकाशिन न करण्याचा निर्णय घेतला होता.

असोसिएटेड जर्नल लिमिटेडवर ९० कोटी रुपयांचे कर्ज झाले होते. काँग्रेसने यंग इंडियन प्रा.लि. नावाची एक नॉन प्रॉफिट कंपनी तयार केली होती. त्यामध्ये ७६ टक्के भागीदारी राहुल गांधी यांची होती. यंग इंडिया प्रा.लि.ने असोसिएटेड जर्नल लिमिटेडचे अधिग्रहण केले होते. दरम्यान, २०१२ मध्ये भाजपा नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी एक जनहित याचिका दाखल करून हे प्रकरण कोर्टात नेले. त्यांनी काँग्रेसवर नॅशनल हेराल्डचे प्रकाशन करणारी कंपनी असोसिएट्स जर्नल लिमिटेडच्या अधिग्रहणामध्ये फसवणूक झाल्याचा आरोप केला होता. तेव्हापासून हे प्रकरण कोर्टात आहे.  

टॅग्स :congressकाँग्रेसEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयPoliticsराजकारण