शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी: हेमंत सोरेन अचानक दिल्लीला रवाना; ईडीची टीमही निवासस्थानी दाखल, अटक होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 11:15 IST

ईडीकडून २८ जानेवारी रोजी पुन्हा एकदा समन्स आल्यानंतर हेमंत सोरेन हे नवी दिल्लीतील आपल्या शांती निकेतन या निवासस्थानी गेले होते.

Hemant Soren ( Marathi News ) :झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यामागे गेल्या काही दिवसांपासून सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे. अशातच काही वेळापूर्वी ईडीची टीम मुख्यमंत्री सोरेन यांच्या दिल्लीतील निवासस्थानी दाखल झाल्याची माहिती आहे. कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात सुरू असलेल्या चौकशीदरम्यान सोरेन यांना अटक होऊ शकते, अशी शक्यतही वर्तवली जात आहे.

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात हेमंत सोरेन यांची चौकशी सुरू असून ईडीने सोरेन यांच्याकडे २९ ते ३१ जानेवारीदरम्यान चौकशीसाठी वेळ मागितली होती. मात्र २८ जानेवारी रोजी ईडीचं पुन्हा एकदा समन्स आल्यानंतर हेमंत सोरेन हे नवी दिल्लीतील आपल्या शांती निकेतन या निवासस्थानी गेले होते. त्यानंतर आज दुसऱ्याच दिवशी ईडीचे अधिकारीही शांती निकेतन इथं पोहोचले आहेत. 

अचानक दिल्लीत का पोहोचले हेमंत सोरेन?

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हेमंत सोरेन यांचा दिल्ली दौरा पूर्वनियोजित नव्हता. मात्र २८ जानेवारी रोजी पुन्हा ईडीचं समन्स आल्यानंतर सोरेन अचानक दिल्लीकडे रवाना झाले. खरंतर २९ जानेवारी रोजी चाईबासा इथं, ३० जानेवारी रोजी पलामू इथं आणि ३१ जानेवारी रोजी गिरीडीह इथं सोरेन यांच्या कार्यक्रमांचं नियोजन होतं. मात्री ईडी नोटिसीनंतर कायदेशीर सल्ला घेण्यासाठी ते दिल्लीला गेल्याचे समजते.

दरम्यान, सदर जमीन घोटाळ्यात ईडीने आतापर्यंत तब्बल १४ जणांना अटक केली आहे. यामध्ये २०११ च्या बॅचचे आयएएस अधिकारी छवि रंजन यांचाही समावेश आहे. ते झारखंडच्या समाज कल्याण विभागाचे अधिकारी आणि रांचीचे उपायुक्त म्हणून कार्यरत होते.  

टॅग्स :JharkhandझारखंडJharkhand Mukti Morchaझारखंड मुक्ती मोर्चाEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय