शहरं
Join us  
Trending Stories
1
पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष  
2
पुतिन भारतात पोहोचण्यापूर्वीच मोठी बातमी येऊन धडकली, 2 अब्ज डॉलरच्या डीलवर शिक्कामोर्तब; पाक-चीनची झोप उडणार!
3
विराट कोहली, रोहित शर्मा दोघेही 'दादा' क्रिकेटर, त्यांच्या नादाला लागाल तर...- रवी शास्त्री
4
पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली...
5
AUS vs ENG Ashes Test : एकाच वेळी दोघे कॅचसाठी झेपावले; धडक झाली, पण कॅरीनं चेंडू पकडला अन्...
6
170 अब्ज डॉलर्सचे व्हॅल्युएशन, 38000 कोटी उभारण्याची तयारी; कधी येणार Jio IPO?
7
डॉ. गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरण: आई-वडील CM फडणवीसांना भेटले; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
8
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
9
मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा पुन्हा संसदेत, मविआ खासदारांचे प्रश्न; नितीन गडकरी म्हणाले...
10
दोन दशकांची मैत्री; पीएम मोदी आणि पुतिन यांची पहिली भेट कधी झालेली? पाहा फोटो...
11
“१७५ जागा आल्या, तर भाजपाने बेईमानी करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल”; कुणी केला दावा?
12
काहींना टबमध्ये बुडवलं तर काहींना...; 'सायको काकी'ची थरकाप उडवणारी मोडस ऑपरेंडी
13
१० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरु; चाचणीनंतर वर्षभरात देशभर...; गडकरींची लोकसभेला माहिती
14
आता 'या' राज्यात महिलांच्या खात्यात 2100 नाही, थेट 6300 रुपये जमा होणार! सरकारचा मोठा निर्णय, खुद्द मुख्यमंत्र्यांनीच सांगितला नवा 'प्लॅन'
15
प्रेमाच्या नादात दोन मुलांच्या आईचं 'कांड', पतीला दिला धोका; बहिणीचा संसार, सुरू होण्याआधीच मोडला!
16
Travel : पुतिन यांच्या रशियात फिरायला जायचा विचार करताय? किती खर्च येईल आणि कुठे कुठे फिराल? जाणून घ्या..
17
“महायुती सरकार बौद्धिक, आर्थिक दिवाळखोरीत; शेतकरी, लाडक्या बहिणींना फसवले”: हर्षवर्धन सपकाळ
18
30 दिवस, 14000 उड्डाणे रद्द, Indigo अडचणीत येण्याचे काय कारण? परिस्थिती कधी सुधारेल?
19
भाईंदरमध्ये मराठी माणसाला फ्लॅट नाकारला? जैन, मारवाडी, ब्राह्मण असाल तरच घर; बिल्डर लॉबीचा मनमानी कारभार
20
२००० मंत्र, २०० वर्ष असाध्य; १९ वर्षीय देवव्रतने ५० दिवसात केलेले दंडक्रम पारायण नेमके काय?
Daily Top 2Weekly Top 5

पुतिन भारतात पोहोचण्यापूर्वीच मोठी बातमी येऊन धडकली, 2 अब्ज डॉलरच्या डीलवर शिक्कामोर्तब; पाक-चीनची झोप उडणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 18:50 IST

या करारासंदर्भात गेल्या १० वर्षांपासून चर्चा सुरू होती...

रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर भारत दौऱ्यावर येत आहेत. मात्र ते दिल्लीत पोहचण्यापूर्वीच एक मोठी बातमी येऊन धडकली आहे. भारत आणि रशिया यांच्यात एक मोठा संरक्षण करार झाला आहे. भारत आणि रशियादरम्यान अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीसाठी अर्थात न्यूक्लियर सबमरीनसाठी सुमारे २ अब्ज डॉलर्सच्या (जवळपास १६७०० कोटी रुपये) करारावर अंतिम शिक्कामोर्तब झाले आहे. या करारासंदर्भात गेल्या १० वर्षांपासून चर्चा सुरू होती.

नौदल प्रमुख दिनेश के त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, "भारताला ही पाणबुडी २०२७ पर्यंत मिळणे अपेक्षित आहे. रशियाकडून भारताला मिळणारी ही दुसरी अणुपाणबुडी असेल. यापूर्वी, भारताने २०१२ मध्ये 'आयएनएस चक्र' ही पाणबुडी १० वर्षांच्या भाडेपट्टीवर घेतली होती.

चीन-पाकिस्तानची झोप उडणार - अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्या डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुड्यांच्या तुलनेत प्रचंड सरस असतात. त्या आकारमानाने मोठ्या, अधिक शांत असतात आणि जास्त काळ पाण्याखाली राहू शकतात. महत्वाचे म्हणजे, शांत असल्याने शत्रूला त्यांचा शोध घेणे कठीण होते. हिंदी आणि प्रशांत महासागराच्या विशाल प्रदेशात गस्त घालताना या पाणबुडीचा शोध घेणे कठीण असल्याने चीन आणि पाकिस्तानची झोप उडणार आहे.

भारतही तयार करतोय अणुऊर्जेवर चालणाऱ्या अटॅक सबमरीन - भारत स्वतःही अणुऊर्जेवर चालणाऱ्या अटॅक सबमरीन (Attack Submarine) बनवण्याची तयारी करत आहे. सध्या अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, चीन आणि रशिया या मोजक्याच देशांकडे अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्या तैनात करण्याची आणि चालवण्याची क्षमता आहे.

नौदल प्रमुखांनी म्हटले आहे की, भारताची तिसरी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी पुढील वर्षी नौदलात सामील होणे अपेक्षित आहे. याशिवाय, ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, भारत दोन अणुऊर्जेवर चालणाऱ्या आणि हल्ला करणाऱ्या पाणबुड्यांचीही निर्मिती करत आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : India, Russia Seal $2B Nuclear Sub Deal; China, Pak Uneasy

Web Summary : India and Russia finalized a $2 billion deal for nuclear submarine. Expected by 2027, this second Russian nuclear submarine strengthens India's naval power. Its stealth capabilities in the Indian and Pacific Oceans will worry China and Pakistan. India is also building its own nuclear attack submarines.
टॅग्स :russiaरशियाindian navyभारतीय नौदलIndiaभारतVladimir Putinव्लादिमीर पुतिनNarendra Modiनरेंद्र मोदी