शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! नरेंद्र मोदींच्या हुंकार रॅलीतील बॉम्बस्फोट प्रकरणी 9 आरोपी दोषी, एकाची निर्दोष मुक्तता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 15:21 IST

Patna Gandhi Maidan Blast:27 ऑक्टोबर 2013 रोजी पाटणा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रॅलीदरम्यान गांधी मैदानात बॉम्बस्फोट झाला होता.

पाटणा:बिहारमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. पाटणाच्या गांधी मैदान बॉम्बस्फोट प्रकरणाची NIA कोर्टाने सुनावणी पूर्ण केली आहे. पाटणाच्या या प्रसिद्ध प्रकरणातील 10 आरोपींपैकी एका आरोपीची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे, तर इतर 9 जणांना दोषी ठरवलं आहे. आरोपींमध्ये उमर सिद्दीकी, अझहर कुरेशी, अहमद हुसैन, फिरोज अस्लम, इफ्तेखार आलम यांचा समावेश आहे. न्यायालयाने फकरुद्दीन या एका आरोपीची सुटका केली. या प्रकरणात आता शिक्षेच्या मुद्यांवर 1 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.

27 ऑक्टोबर 2013 रोजी पाटणा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रॅलीदरम्यान गांधी मैदानात बॉम्बस्फोट झाला होता. भाजपच्या हुंकार रॅलीदरम्यान साखळी बॉम्बस्फोटांमुळे चेंगराचेंगरी झाली होती. या स्फोटावेळी नरेंद्र मोदींसह सर्व नेते गांधी मैदानात उपस्थित होते. गांधी मैदानापूर्वी पाटणा जंक्शनवरही स्फोट झाला होता. पाटणा येथे झालेल्या या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला होता तर सुमारे 84 जण जखमी झाले होते.

या आरोपींना अटकपाटणाच्या गांधी मैदान बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएने दुसऱ्याच दिवसापासून या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि वर्षभरात 21 ऑगस्ट 2014 रोजी एकूण 11 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. यानंतर एनआयएच्या पथकाने याप्रकरणी हैदर अली, नोमान अन्सारी, मोहम्मद, मुजीबुल्ला अन्सारी, इम्तियाज आलम, अहमद हुसेन, फकरुद्दीन, मोहम्मद. फिरोज अस्लम, इम्तियाज अन्सारी, मो. इफ्तिकार आलम, अझरुद्दीन कुरेशी आणि तौफिक अन्सारी यांना अटक केली.

हैदर अली आणि मोजिबुल्ला हे पाटणाच्या गांधी मैदान बॉम्बस्फोटाचे सूत्रधार होते. त्या दोघांना पोलिसांनी घटनास्थळावरुनच अटक केले होते. त्यानंतर चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. हुंकार रॅलीत मोठा स्फोट घडवून आणण्यासाठी तो त्याच्या संपूर्ण टीमसह गांधी मैदानावर पोहोचल्याचे त्याने चौकशीत सांगितले होते. 

एनआयएच्या पथकाने अटक केलेल्या दहशतवादी इम्तियाजची कडक चौकशी सुरू केली तेव्हा त्याने अनेक नावे सांगितली. यानंतर तपास यंत्रणेने मास्टर माइंड मोनू उर्फ ​​तहसीनसह दोन डझनहून अधिक दहशतवाद्यांना पकडले. यानंतर बोधगया बॉम्बस्फोट प्रकरणातही मोठी माहिती या दहशतवाद्याच्या चौकशीतून समोर आली होती. 

टॅग्स :BiharबिहारNarendra Modiनरेंद्र मोदीBombsस्फोटके