शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

Varanasi Boat Accident: मोठी दुर्घटना! वाराणसीमध्ये ६० प्रवाशांनी भरलेली बोट उलटली, शोधमोहिम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 14:35 IST

Varanasi Boat Accident: गंगेच्या मध्यभागी मान मंदिर घाट जवळ शुक्रवारी प्रवाशांनी भरलेली बोट उलटली. बचाव सुरू आहे.

शुक्रवारी वाराणसीतील मान मंदिर घाटाजवळ ६० प्रवाशांना घेऊन जाणारी बोट उलटली. या अपघातात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. जल पोलीस आणि खलाशांच्या मदतीने सर्व प्रवाशांना वाचवण्यात आले आहे. बोटीवरील सर्व भाविक ओरिसाचे रहिवासी आहेत असल्याचे सांगण्यात येत आहे. 

"सरकार मृतांचे आकडे लपवतंय, कारण..."; चेंगराचेंगरीवरून अखिलेश यादवांचे योगी सरकारवर गंभीर आरोप

मिळालेल्या माहितीनुसार, गंगेच्या मध्यभागी मान मंदिर घाट ओलांडून एक मोठी बोट आणि एक लहान बोट यांच्यात टक्कर झाल्यानंतर हा अपघात झाला. बोटीतील सर्व भाविकांनी लाईफ जॅकेट घातले होते, यामुळे सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे वाचवता आले. घटनास्थळी जल पोलीस आणि एनडीआरएफची टीम उपस्थित आहेत.

या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एनडीआरएफचे बचाव कर्मचारी गंगा नदीतून प्रवाशांना वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे सांगितले जात आहे. 

काही दिवसापूर्वी चेंगराचेंगरी झाली होती

महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीनंतर, महाकुंभमेळा प्रशासन आणि प्रयागराज जिल्हा प्रशासन प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक उचलत आहे. प्रयागराज आयुक्तालयातून डायव्हर्शन स्कीम काढून टाकण्यात येत आहे.  महाकुंभमध्ये पुन्हा अग्नितांडव

काही दिवसापूर्वी या मेळामध्ये मोठी आग लागल्याची घटना समोर आली होती. आता पुन्हा एकदा आग लागल्याची बातमी समोर आली आहे. चमनगंज झुंसीजवळील जुना आखाड्याच्या छावणीत लागलेल्या आगीत १५ तंबू जळून खाक झाले. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने आग आटोक्यात आणली आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, या आगीच्या घटनेत १५ तंबू जळून खाक झाले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाला तात्काळ कळवण्यात आले. तेथे पोहोचण्यासाठी कोणताही मार्ग नसल्याने अग्निशमन दलाला तंबूपर्यंत पोहोचण्यास अडचण आली. असे असूनही, अग्निशमन दल वेळेवर पोहोचले आणि कोणतीही मोठी दुर्घटना न होता आग आटोक्यात आणली.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशVaranasiवाराणसी