शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 12:00 IST

Poverty In India Fall: जागतिक बँकेचा एक अहवाल आला असून, यात मोदी सरकारच्या अनेक योजनांची दखल घेण्यात आली आहे. तसेच मोदी सरकारच्या कामगिरीचे कौतुकही करण्यात आले आहे.

Extreme Poverty Down In India: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रातील सरकारला सत्तेत येऊन ११ वर्षे झाली आहेत. गेल्या ११ वर्षांत अनेक स्तरांवर विविध प्रकारचे विक्रम सरकारने रचले आहेत. अयोध्येतील राम मंदिर ते ऑपरेशन सिंदूर हा पंतप्रधान मोदी सरकारचा मोठा आलेख वाढत गेलेला पाहायला मिळत आहे. विरोधक सातत्याने देशातील गरिबी, बेरोजगारी अशा अनेकविध मुद्द्यांवर बोट ठेवून केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. यातच भारतातील गरिबीबाबत एक अहवाल आला आहे. यातील आकडेवारीमुळे भारतातील गरिबी कमी झाली का, किती कमी झाली, याबाबत सविस्तर आकडेवारी मांडल्याचे सांगितले जात आहे. 

भारत वेगाने विकास करत असून, अलीकडेच जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. यातच आता जागतिक बँकेने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गरिबीविरुद्धच्या लढाईत मोठा विजय मिळवला आहे. गेल्या ११ वर्षांत भारतातील अत्यंतिक गरिबांची संख्या २७.१ टक्क्यांवरून फक्त ५.३ टक्क्यांवर आली आहे, असे या अहवालात आकडेवारीसह सांगण्यात आले आहे.

भारतातील अत्यंतिक गरिबी कमी झाली

जागतिक बँकेच्या अहवालानुसार, २०२२-२३ मध्ये भारतातील अत्यंतिक गरिबी ५.३ टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. गेल्या दशकात म्हणजेच २०११-१२ मध्ये देशात अत्यंत गरिबीत जगणाऱ्या नागरिकांचा दर २७.१ टक्क्यांवर होता. तो आता ५.३ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. जागतिक बँकेने त्यांच्या दारिद्र्यरेषेच्या मर्यादेत दररोज ३ अमेरिकन डॉलर्सपर्यंत सुधारणा केली आहे. 

ग्रामीण आणि शहरी भागातील गरिबीचे प्रमाण किती घटले?

जागतिक बँकेच्या अहवालात म्हटले आहे की, ग्रामीण भागात अत्यंत दारिद्र्यरेषेचा आकडा १८.४ टक्क्यांवरून २.८ टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. तर शहरी भागात १०.७ टक्क्यांवरून १.१ टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. ग्रामीण-शहरी दारिद्र्यरेषा ७.७ टक्क्यांवरून १.७ टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे, असे या जागतिक बँकेने म्हटले आहे.

ही बाब मोदी सरकारसाठी एक मोठे यश

जागतिक बँकेच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, २०११-१२ मध्ये दारिद्र्यरेषेखाली जगणाऱ्या भारतीयांची संख्या (प्रतिदिन ३ डॉलर या मानकानुसार) ३४ कोटी इतकी नोंदवली गेली होती. त्या तुलनेत २०२२-२३ मध्ये ही संख्या ७.५ कोटींवर आली. याचाच अर्थ देशातील २६.५ कोटी लोक अत्यंत गरिबीतून बाहेर आले आहेत. ही बाब मोदी सरकारसाठी एक मोठे यश मानले जात आहे. 

दरम्यान, भारतातील गरिबांच्या संख्येवरील जागतिक बँकेच्या या अहवालात, मोदी सरकारच्या मोफत आणि अनुदानित अन्न हस्तांतरण योजनांनी देशातील गरिबी कमी करण्यात सर्वांत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याच्या मदतीने ग्रामीण-शहरी गरिबीतील दरी झपाट्याने कमी झाली आहे. जागतिक बँकेच्या मते, गेल्या दशकात भारताने गरिबी मोठ्या प्रमाणात कमी करण्यात यश मिळवले असून, या मोठ्या कामगिरीबद्दल मोदी सरकारचे कौतुक करण्यात आले आहे.

 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकार