UP मंत्रालयातील बापू भवनमध्ये भीषण आग , थोडक्यात वाचले मंत्री
By Admin | Updated: March 28, 2017 19:56 IST2017-03-28T19:56:28+5:302017-03-28T19:56:28+5:30
लखनऊ येथील सचिवालय आणि विधानसभेजवळील बापू भवनमध्ये भीषण आग

UP मंत्रालयातील बापू भवनमध्ये भीषण आग , थोडक्यात वाचले मंत्री
>ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 28 - लखनऊ येथील सचिवालय आणि विधानसभेजवळील बापू भवनमध्ये लागलेल्या भीषण आगीवर ताबा मिळवण्यात यश आलं आहे. आज दुपारी चारच्या सुमारास ही आग लागली होती. आग लागली त्यावेळी राज्यमंत्री मोहसिन रजा आणि मंत्री धर्मसिंह सैनी तिथे उपस्थित होते. 20 मिनिटांच्या प्रयत्नांनंतर त्यांना बाहेर काढण्यात आलं.
12 मजली इमारतीच्या दुस-या मजल्यावर आग लागली होती. तिस-या मजल्यापर्यंत आग फोफावली होती. आग लागली त्या ठिकाणी मंत्री आणि अधिकाऱ्यांची कार्यालयं आहेत. आग लागल्यानंतर कर्मचा-यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाने आगीवर ताबा मिळवला.