शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
2
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
3
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
4
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
5
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
6
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
7
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
8
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
9
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
10
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
13
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
14
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
15
वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
16
‘लोक माझ्यावर जळतात, माझ्याविरोधात…’, पराभवानंतर अजिंक्य रहाणे संतापला, टीकाकारांवर बरसला
17
Peace Of Mind: नातं की ओझं? भगवान बुद्धांच्या 'या' एका सूत्राने दूर होईल तुमच्या मनातील सर्व गोंधळ!
18
Success Story: १०,००० पगार ते ४०० कोटींचा व्यवसाय, कसा होता ब्रॉडबँड सेवा पुरवणाऱ्या जम्मू काश्मीरच्या विवेक रैनांचा प्रवास?
19
गोरखपूर ट्रेन नाही, रत्नागिरी पॅसेंजरमुळे ८ लोकलला फटका; दादरला येणार की नाही? मध्य रेल्वे म्हणते…
20
होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... 
Daily Top 2Weekly Top 5

मोठा निर्णय! आता केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची चौकशी राज्य पोलीसही करू शकणार; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 10:53 IST

SC order on Central employees investigation: राजस्थानमधील एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हा ऐतिहासिक निकाल दिला. केंद्र सरकारच्या एका कर्मचाऱ्यावर लाचलुचपत किंवा भ्रष्टाचाराचे आरोप होते.

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना तपासापासून मिळणारे 'संरक्षण' आता संपुष्टात आले आहे. एका अत्यंत महत्त्वपूर्ण निकालात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, केंद्र सरकारच्या कोणत्याही कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हेगारी प्रकरणाचा तपास करण्याचा पूर्ण अधिकार राज्य पोलिसांना आहे. यासाठी सीबीआय किंवा केंद्राच्या विशेष परवानगीची गरज नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

राजस्थानमधील एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हा ऐतिहासिक निकाल दिला. केंद्र सरकारच्या एका कर्मचाऱ्यावर लाचलुचपत किंवा भ्रष्टाचाराचे आरोप होते. अशा प्रकरणांचा तपास केवळ दिल्ली विशेष पोलीस आस्थापना करू शकते, असा युक्तिवाद करण्यात आला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावला.

न्यायालयाने निकालात काय म्हटले?केंद्राच्या कर्मचाऱ्यांविरुद्धच्या गुन्ह्यांचा तपास करण्याचा अधिकार केवळ सीबीआयकडेच मर्यादित नाही. राज्य पोलीस देखील अशा प्रकरणांचा तपास करून कायदेशीर कारवाई करू शकतात. कायदा आणि सुव्यवस्था हा राज्याचा विषय आहे. त्यामुळे राज्याच्या हद्दीत घडणाऱ्या कोणत्याही गुन्ह्याचा तपास करण्याचे अधिकार स्थानिक पोलिसांना संविधानाने दिले आहेत. या निर्णयामुळे भ्रष्टाचाराविरुद्धच्या मोहिमेला बळ मिळणार आहे. अनेकदा केंद्राच्या परवानगीच्या प्रतीक्षेत तपासाला विलंब होतो, जो आता टाळता येईल.

या निर्णयाचा काय परिणाम होणार?आता राज्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग किंवा स्थानिक पोलीस केंद्राच्या विभागांमध्ये कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर थेट छापा टाकू शकतात किंवा त्यांना अटक करू शकतात.तपासासाठी आता लांबच लांब प्रशासकीय प्रक्रियेची वाट पाहावी लागणार नाही. सरकारी यंत्रणेतील पारदर्शकता वाढवण्यासाठी हा निर्णय मैलाचा दगड ठरू शकतो.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयGovernmentसरकार