मुंबई-पुण्याबाहेरील कलावंतांमध्येही मोठी क्षमता
By Admin | Updated: February 20, 2016 00:07 IST2016-02-20T00:07:05+5:302016-02-20T00:07:05+5:30
- माजी संमेलनाध्यक्षा फय्याज यांचे गौरवोद्गार

मुंबई-पुण्याबाहेरील कलावंतांमध्येही मोठी क्षमता
- ाजी संमेलनाध्यक्षा फय्याज यांचे गौरवोद्गारहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेनगरी (ठाणे) : संमेलनाध्यक्ष झाल्यानंतर वर्षभर 10-12 शाखांना भेटी दिल्या. नव्या गायक-गायिकांची गाणी ऐकली. मुंबई-पुण्याबाहेरसुद्धा खूप मोठे टॅलेंट असल्याची प्रचिती मला आली. ते टॅलेंट शोधून काढण्याची गरज असल्याचे मत माजी संमेलनाध्यक्षा ज्येष्ठ अभिनेत्री फय्याज शेख यांनी व्यक्त केले. 96व्या नाट्यसंमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात फय्याज यांनी आपल्या वर्षभरातील अध्यक्षपदाच्या कारकिर्दीचा आढावा घेतला. त्या म्हणाल्या, संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक न घेता जाणकार रंगकर्मी, नियामक मंडळ आणि मध्यवर्तीच्या कार्यकारिणीने एकमताने निवड करावी. त्यात नेपथ्यकार, प्रकाशयोजनाकार, वेशभूषाकार अशांचाही समावेश असावा, असेही त्या म्हणाल्या. नाट्यपरिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी म्हणाले, बॅकस्टेज आर्टिस्टला वेगवेगळी कामे करताना अपघात होत असतात. त्यामुळे रुग्णालये महानगरपालिकांतर्गत येणार्या रुग्णालयांमध्ये त्यांच्यासाठी तिथे 2 बेड असावेत, अशी मागणी केली. शासन, महानगरपालिकांची नाट्यगृहे बालनाटकांसाठी सवलतीच्या दरात मिळावीत, असे सांगत परिषदेचे यशवंत नाट्यगृह आम्ही अध्र्या दरात देतो, असे सांगितले.