शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा दाखल केला उमेदवारी अर्ज, शाह-राजनाथ यांच्यासह हे दिग्गज होते उपस्थित
2
कोरेगाव भीमा प्रकरणः गौतम नवलखा यांना जामीन, प्रक्षोभक भाषणाच्या आरोपावरून होते नजरकैदेत
3
"दिल्लीच्या 'त्या' बैठकीत मोदींनी ठाकरेंना पुन्हा एकत्र येण्याची ऑफर दिली होती"
4
T20 World Cup 2024 साठी बांगलादेशचा तगडा संघ; २२ वर्षीय खेळाडूला संधी!
5
होर्डिंगच्या पायाभरणीतील 'ती' एक चूक अन् १४ कुटुंबांवर कोसळला दुःखाचा डोंगर!
6
सोनं -चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! दुसऱ्या दिवशीही दर कोसळले; वाचा आजचे दर
7
Fact Check: PM मोदींच्या विजयावर शंका घेणारा नितीश कुमारांचा व्हायरल व्हिडिओ जुना; पाहा, सत्य
8
4 जूनला किती वेळ राहिलाय, थोडा धीर...; पृथ्वीराज चव्हाणांच्या अंदाजावर भुजबळांचा सल्ला
9
'तू आई होऊ शकत नाहीस'; डॉक्टरांनी रुपाली गांगुलीला दिला होता IVF चा सल्ला, पण..
10
पावसानं गुजरातला 'बुडवलं', पण फ्रँचायझीकडून चाहत्यांना 'खुशखबर', केली मोठी घोषणा!
11
हायप्रोफाईल चोर, हवेतल्या हवेत मारायचा मौल्यवान दागिन्यांवर डल्ला, वर्षभरात २०० विमानात केली चोरी 
12
"लोक मदतीसाठी ओरडत होते पण आम्ही काहीच करु शकलो नाही"; होर्डिंग कोसळलं, 14 जणांचा मृत्यू
13
यशवंत जाधव, रवींद्र वायकर हे महापालिकेचे लाभार्थी, ज्यांनी मुंबई लुटली - संजय राऊत
14
बळीराजासाठी आनंदाची बातमी! येत्या ८ दिवसांत मान्सून अंदमानात दाखल होणार
15
अखेर दयाबेन सापडली! ७ वर्षांनंतर 'तारक मेहता...'मध्ये दिशा वकानीला रिप्लेस करणार २८ वर्षीय अभिनेत्री
16
इस्रायलला गाझावर अणुबॉम्ब टाकण्याची परवानगी मिळायला हवी; अमेरिकी खासदाराचे खळबळजनक वक्तव्य
17
आईच्या निधनानंतर आता...; वाराणसीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भावुक झाले पंतप्रधान मोदी
18
DC vs LSG : 'करा किंवा मरा'! पंतची एन्ट्री; राहुलसोबतच्या नाट्यमय घडामोडींनंतर पहिलाच सामना
19
Fact Check : हैदराबादमध्ये मोदींनी AIMIM ला पाठिंबा दिल्याच्या Video दिशाभूल करणारा; जाणून घ्या 'सत्य'
20
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?

Ayodhya Case : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितला राम मंदिराच्या बांधणीचा प्लॅन, लोकसभेत केली मोठी घोषणा  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2020 11:26 AM

Ayodhya Case : अयोध्येतील वादग्रस्त भूमी ही राम जन्मभूमीच असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राम मंदिराच्या बांधणीचा मार्ग मोकळा झाला होता.

ठळक मुद्देअयोध्येत राम मंदिर बांधण्याच्या दृष्टीन केंद्र सरकारने आज मोठा निर्णय घेतलाराममंदिराच्या बांधणीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार ट्र्स्टची स्थापना करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत केलीराम मंदिराच्या निर्मितीसाठी स्थापन करण्यात आलेल्या ट्रस्टचे नाव श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट असे ठेवण्यात आले आहे

नवी दिल्ली - अयोध्येतील वादग्रस्त भूमी ही राम जन्मभूमीच असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राम मंदिराच्या बांधणीचा मार्ग मोकळा झाला होता. दरम्यान, अयोध्येत राम मंदिर बांधण्याच्या दृष्टीन केंद्र सरकारने आज मोठा निर्णय घेतला असून, मंदिराच्या बांधणीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार ट्र्स्टची स्थापना करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत केली.

राम मंदिराच्या निर्मितीसाठी स्थापन करण्यात आलेल्या ट्रस्टचे नाव ' श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र' असे ठेवण्यात आले आहे, अशी माहिती मोदींनी आज लोकसभेत दिली. ‘’आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत अयोध्येत राम मंदिर बांधण्याबाबत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. माझ्या नेतृत्वाखालील सरकारने रामजन्मभूमीवर भव्य मंदिर बांधण्यासाठी तसेच यासंबंधीच्या इतर विषयांवर देखरेख ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांनुसार एक व्यापक योजना तयार केली आहे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार श्रीरामजन्मभूमी ट्रस्ट या स्वायत्त ट्रस्टची स्थापना करण्याचा प्रस्ताव पारित करण्यात आला आहे.’’असे मोदींनी सांगितले.

’’श्रीरामजन्मभूमी ट्रस्ट अयोध्येत एक भव्यदिव्य राममंदिराची निर्मिती आणि त्याच्यासंबंधीचे निर्णय घेण्यासाठी स्वायत्त असेल. तसेच व्यापक विचारविमिनमय केल्यानंतर सुन्नी वक्फ बोर्डाला पाच एकर जमिन देण्याची सूचना ऊत्तर प्रदेश सरकारला करण्यात आली आहे. तसेच त्याला मान्यताही देण्यात आली आहे,’’असे मोदी म्हणाले.

‘’भारतातील कणाकणामध्ये आदर्शामध्ये, मर्यादांमध्ये श्रीराम आहेत. श्रीराम आणि अयोध्येच्या ऐतिकासिकतेचा आपणा सर्वाना परिचय आहे. अयोध्येत राम मंदिराची निर्मिती आणि वर्तमान तसेच भविष्य काळात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या विचारात घेऊन अजून एक निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार अयोध्येध्येमध्ये कायद्यानुसारा अधिकग्रहीत करण्यात आलेली सुमारे ६७ एकर जमीन नव्याने निर्माण करण्यात आलेल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला हस्तांतरीत करण्यात येणार आहे.’’असेही मोदींनी सांगितले.

उद्धव ठाकरे, प्रभू रामचंद्र प्रश्न विचारतील तेव्हा काय उत्तर द्याल?; मनसेचे चोख प्रत्युत्तर

2.75 लाख गावांमध्ये भगवान रामाची प्रतिमा लावणार, मंदिर बांधण्याआधी VHP चा मोठा कार्यक्रम 

चार महिन्यांत अयोध्येत गगनचुंबी राम मंदिर उभारू; अमित शहांचं मोठं विधान

 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकार