दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठीची रणधुमाळी आता रंगात येऊ लागली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशी घुसखोरांचा विषय दिल्लीमध्ये गाजत असून, मागच्या काही दिवसांपासून बांगलादेशी घुसखोरांविरोधात पोलिसांकडून जोरदार कारवाईही केली जात आहे. दरम्यान, बांगलादेशी घुसखोरांना आश्रय देणाच्या एका प्रकरणामधून आम आदमी पक्ष अडचणीत येण्याची शक्यता आहे. बांगलादेशी घुसखोरांना आश्रय दिल्या प्रकरणी आम आदमी पक्षाचे रिठाला येथील आमदार महेंद्र गोयल यांना दिल्ली पोलिसांनी नोटिस बजावली आहे. तसेच त्यांना चौकशीसाठी बोलावले आहे.
बेकायदेशील बांगलादेशी घुसखोरांकडून जी कागदपत्रे जप्त कऱण्यात आली आहेत. त्यांच्यावर आपचेआमदार महेंद्र गोयल यांच्या स्वाक्षऱ्या सापडल्या आहेत. तसेच त्या कागदपत्रांवर महेंद्र गोयल यांच्या नावाचा शिक्काही उमटवलेला होता. आता या प्रकरणी दिल्ली पोलीस महेंद्र गोयल यांच्याकडे अधिक चौकशी करणार आहेत.
मागच्या काही दिवसांपासून दिल्लीमध्ये पोलिसांनी बांगलादेशी घुसखोरांविरोधात विशेष अभियान राबवण्यास सुरुवात केली आहे. यानुसार दिल्लीमध्ये बेकायदेशीर पद्धतीने राहणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांची ओळख पटवून त्यांना परत त्यांच्या देशात पाठवण्यात येत आहे. अशा परिस्थितीत दिल्ली पोलिसांनी काही बांगलादेशी घुसखोरांना पकडून त्यांच्याकडील कागदपत्रांची तपासणी केली असता त्यावर रिठाला येथील आमदार महेंद्र गोयल यांची स्वाक्षरी आणि शिक्का दिसून आला. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी त्वरित कारवाई करत आमदार महेंद्र गोचल यांना नोटिस बजावून चौकशीसाठी बोलावलं आहे.