शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

नितीश कुमार यांना मोठा धक्का! बिहारला विशेष राज्याचा दर्जा मिळणार नाही, JDU च्या मागणीवर सरकारचं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 14:30 IST

गेल्या अनेक वर्षांपासून बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी होत आहे.

नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना केंद्र सरकारकडून मोठा धक्का बसला आहे. अनेक वर्षांपासून बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षाकडून करण्यात येत आहे. मात्र, या मागणीसंदर्भात लोकसभेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी केंद्र सरकारच्यावतीनं मोठं वक्तव्य केलं आहे. पंकज चौधरी यांनी लोकसभेत उत्तर देताना बिहारला विशेष राज्याचा दर्जा देणं शक्य नसल्याचं म्हटलं आहे.

विशेष राज्याच्या दर्जासाठी ज्या तरतुदी पूर्ण कराव्या लागतात, त्या बिहारमध्ये नाहीत, असं मंत्री पंकज चौधरी यांनी सांगितलं. दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी होत आहे. अलीकडेच, रविवारी दिल्लीत सर्वपक्षीय बैठकीदरम्यान, जेडीयूचे राज्यसभा खासदार संजय झा यांनी बिहारला विशेष राज्याचा दर्जा किंवा विशेष पॅकेज देण्याची मागणी केली होती. बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही अनेकदा केली होती.

सोमवारी सर्वसाधारण अर्थसंकल्पापूर्वी जेडीयूने पुन्हा एकदा बिहारला विशेष राज्याचा दर्जा आणि विशेष मदत देण्याची मागणी केली आहे. जेडीयूचे मुख्य प्रवक्ते केसी त्यागी म्हणाले की, बिहारला विशेष दर्जा देण्याची मागणी हा बिहारच्या जनतेचा आवाज आहे. जेडीयूनं मागणीचं पत्र नाही तर अधिकाराचं पत्र पाठवलं आहे. बिहारला विशेष राज्याचा दर्जा आणि विशेष मदत मिळावी, असं आम्ही म्हटलं आहे. 

इतर राज्यं सुद्धा करतायेत मागणी दरम्यान, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २७५ नुसार कोणत्याही राज्याला विशेष श्रेणी राज्याचा दर्जा देण्याची तरतूद आहे. सध्या देशात एकूण २९ राज्ये आणि ७ केंद्रशासित प्रदेश आहेत. त्यापैकी ११ राज्यांना विशेष श्रेणीतील राज्याचा दर्जा मिळाला आहे. मात्र, आता बिहार, आंध्र प्रदेश, ओडिसा यासह इतर पाच राज्यं विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी करत आहेत. 

विशेष श्रेणी दर्जासाठीचे निकष...- डोंगराळ भूभाग- लोकसंख्येची विरघ घनता आणि / किंवा बऱ्यापैकी आदिवासी लोकसंख्या- आंतरराष्ट्रीय सीमेजवळील मोक्याची जागा- आर्थिक आणि पायाभूत सुविधांच्या दृष्टीकोनातून मागास- राज्याची वित्तीय परिस्थिती अयोग्य / असक्षम असणं

कोणत्या राज्यांना विशेष श्रेणी दर्जा देण्यात आलेला आहे?सध्या भारतातल्या ११ राज्यांना असा विशेष श्रेणी दर्जा देण्यात आला आहे. यामध्ये आसाम, नागालँड, मणीपूर, मेघालय, सिक्कीम, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि तेलंगणाचा समावेश आहे.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहारlok sabhaलोकसभाJanta Dal Unitedजनता दल युनायटेड