शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
4
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
5
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
6
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
7
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
8
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
9
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
10
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
11
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
12
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
13
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
14
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
15
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
16
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
17
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
18
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
19
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
20
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 

गुजरातमध्ये भाजपाला मोठा धक्का, बड्या नेत्याने पक्षाला दिली सोडचिठ्ठी

By बाळकृष्ण परब | Published: December 29, 2020 1:49 PM

Mansukh Vasava resigns : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे. गुजरात भाजपामधील ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असलेल्या मनसुख वसावा यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

ठळक मुद्दे मनसुख वसवा हे भरूच मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात मनसुख वसावा हे गुजरातमधील भाजपाच्या आघाडीच्या नेत्यांपैकी एक आहेत. तसेच आदिवासी समुदायामध्ये त्यांचा मोठा जनाधार आहेमनसुख वासवा यांनी नेमका का राजीनामा दिला आहे. याचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकलेलं नाही

अहमदाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे गृहराज्य असलेल्या गुजरातमध्येभाजपाला मोठा धक्का बसला आहे. गुजरातभाजपामधील ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असलेल्या मनसुख वसावा यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मनसुख वसवा हे भरूच मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, लोकसभा सदस्यत्वाचाही आपण राजीनामा देणार असल्याचे वसावा यांनी स्पष्ट केले आहे.भरुच लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे खासदार असलेल्या मनसुखभाई धनजीभाई वसावा यांनी २८ डिसेंबर रोजी गुजरात प्रदेश भाजपा अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पत्र लिहून आपल्या निर्णयाची माहिती दिली आहे. मात्र मनसुख वासवा यांनी नेमका का राजीनामा दिला आहे. याचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकलेलं नाही. या पत्रात मनसुख वसावा यांनी लिहिले की, मी पक्षासोबत निष्ठेने राहिलो आहे. तसे पक्ष आणि जीवनातील सिद्धांताचे पालन करण्यामध्ये खबरदारी बाळगली आहे. मात्र शेवटी मी एक माणूस आहे आणि माणसाकडून चूक होते. त्यामुळे मी पक्षाचा राजीनामा देत आहे. तसेच संसदेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी मी सदस्यत्वाचाही राजीनामा देणार आहे.मनसुख वसावा हे हल्लीच्या काही विधानांमुळे चर्चेत आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांना पत्र लिहून वसावा यांनी सांगितले की, गुजरातमध्ये आदिवासी महिलांची तस्करी होत आहे. याशिवाय स्टॅच्यु ऑफ युनिटीसंदर्भात वसावा यांनी पंतप्रधान मोदींनाही पत्र लिहिले होते. मोदींना लिहिलेल्या पत्रामधून त्यांनी स्टॅच्यु ऑफ युनिटीच्या आसपासच्या परिसरातील इको सेंसेटिव्ह झोन रद्द करण्याची मागणी केली होती. मनसुख वसावा हे गुजरातमधील भाजपाच्या आघाडीच्या नेत्यांपैकी एक आहेत. तसेच आदिवासी समुदायामध्ये त्यांचा मोठा जनाधार आहे. ३०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने गुजरातमधील २६ पैकी २६ जागा जिंकल्या होत्या.  

टॅग्स :BJPभाजपाGujaratगुजरातPoliticsराजकारण