शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

Yes Bank Case : येस बँक प्रकरणात सीबीआयची मोठी कारवाई; विनोद गोयंका, शाहिद बलवा यांच्या ठिकाणांवर छापेमारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2022 14:44 IST

Yes Bank Case : या प्रकरणी सीबीआय शाहिद बलवा आणि विनोद गोयंका यांच्या परिसराची झडती घेत आहे. या छाप्यादरम्यान त्यांच्या ठिकाणाहून अनेक कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत.

नवी दिल्ली : डीएचएफएल - येस बँक फसवणूक प्रकरणी केंद्रीय तपास संस्थेने (CBI) मोठी कारवाई केली आहे. सीबीआयने मुंबई आणि पुण्यातील या प्रकरणाशी संबंधित संशयितांच्या आठ ठिकाणांवर आणि कार्यालयांवर छापे टाकले. या प्रकरणी सीबीआय शाहिद बलवा आणि विनोद गोयंका यांच्या परिसराची झडती घेत आहे. या छाप्यादरम्यान त्यांच्या ठिकाणाहून अनेक कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. दरम्यान, अलीकडेच सीबीआयने या प्रकरणाशी संबंधित बांधकाम व्यावसायिक संजय छाब्रियालाही अटक केली होती

मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयच्या वेगवेगळ्या पथकांनी ही कारवाई केली आहे. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विनोद गोयंका यांच्या घरावर छापे टाकण्यात आले असतानाच दुसरीकडे मुंबईतील सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी शाहिद बलवा आणि अविनाश भोसले यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयांची झडती घेतली आहे. संजय छाब्रियाच्या अटकेनंतर सीबीआयने याप्रकरणी आपली कारवाई तीव्र केली आहे.

राणा कपूर चर्चेतयेस बँकेचे माजी सीईओ राणा कपूर अलीकडेच खूप चर्चेत होते. ईडीला दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले होते की, काँग्रेसच्या प्रियांका गांधी वाड्रा  यांच्याकडून एमएफ हुसेन यांचे पेंटिंग विकत घेण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आला आणि विक्रीतून मिळालेली रक्कम गांधी कुटुंबाने काँग्रेस अध्यक्षा सोनिया यांच्या वैद्यकीय उपचारांसाठी न्यूयॉर्क येथे वापरली होती. तत्कालीन पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांनी सांगितले होते की, एम एफ हुसेन पेंटिंग विकत घेण्यास नकार दिल्याने त्यांना गांधी कुटुंबाशी नाते निर्माण करण्यात अडचण येईल. शिवाय त्यांना 'पद्मभूषण' पुरस्कार देखील मिळणार नाही, असेही राणा कपूर यांनी ईडीला दिलेल्या निवेदनात म्हटले होते. 

2018 मध्ये सुरू झाले प्रकरणविशेष म्हणजे, फसवणुकीचे हे प्रकरण एप्रिल ते जून 2018 दरम्यान सुरू झाले, जेव्हा येस बँकेने डीएचएफएलच्या अल्प-मुदतीच्या डिबेंचरमध्ये 3,700 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. त्या बदल्यात वाधवांनी कपूर आणि त्यांच्या कुटुंबीयांना डीओआयटी अर्बन व्हेंचर्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडला कर्ज म्हणून 600 कोटी रुपये दिले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीYes Bankयेस बँकbankबँक