शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकाणी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 14:53 IST

स्फोटकांचा साठा जप्त केल्यानंतर, डॉक्टरांसह सात जणांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत “व्हाईट कॉलर टेरर” मॉड्यूलशी संबंधित 200 हून अधिक लोकांची चौकशी झाली आहे.

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्ब स्फोटानंतर, तपास यंत्रणा सतर्क झाल्या असून या प्रकरणाचे धागे जम्मू-काश्मीरपर्यंत पोहोचल्याचे दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्फोटानंतर जम्मू-कश्मीर पोलिसांनी आतापर्यंत 500 ठिकाणी छापेमारी करून सुमारे 600 जणांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई जमात-ए-इस्लामी संघटनेविरुद्ध करण्यात आली आहे. तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, या संघटनेने पुन्हा सक्रिय होण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. हे थांबवण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली.

संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनगर, कुलगाम, पुलवामा, शोपियां आणि बारामुला आदी. अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात छापेमारी करण्यात आली. दरम्यान, दहशतवादी डॉक्टर मॉड्यूलविरोधातही कारवाई करण्यात आली आहे. तीन सरकारी कर्मचारी आणि इतर सात जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. याशिवाय, अनंतनाग, पुलवामा आणि कुलगाम जिल्ह्यांमधूनही संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात आतापर्यंत किमान 10 जणांचा  मृत्यू झाला आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीतून सोर आले आहे की, काही संशयित गेल्या वर्षभरात तुर्कीला गेले होते. स्फोटकांचा साठा जप्त केल्यानंतर, डॉक्टरांसह सात जणांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत “व्हाईट कॉलर टेरर” मॉड्यूलशी संबंधित 200 हून अधिक लोकांची चौकशी झाली आहे. याच महिन्याच्या सुरुवातीला अटक करण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांकडूनच या मॉड्यूलचा खुलासा झाला आहे.

बारामुल्लाच्या सोपोर परिसरात पोलिसांनी 30 ठिकाणी छापेमारी केली असून त्यातून, इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि बंदी घातलेल्या संघटनेचे पोस्टर्स जप्त करण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, जमात-ए-इस्लामी पुन्हा सक्रिय होण्याचा प्रयत्न करत आहे आणि यासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर, ही कारवाई करण्यात आली.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Kashmir Crackdown After Delhi Blast: Hundreds Detained, Terror Module Exposed

Web Summary : Following the Delhi blast, J&K police raided 500 locations, detaining 600 linked to Jamaat-e-Islami. Raids targeted terror modules, including doctors. Suspects with Turkey links are investigated; electronic gadgets and banned posters seized.
टॅग्स :TerrorismदहशतवादterroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीरPoliceपोलिस