शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

भूपेंद्र पटेल गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी; १६ मंत्र्यांचाही मंत्रिमंडळात समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 05:58 IST

शपथविधीनंतर पंतप्रधान जनतेसमोर नतमस्तक झाले. यानंतर त्यांनी पटेल यांच्या मंत्रिमंडळाची भेट घेऊन त्यांच्यासोबत छायाचित्रे काढली.

लोकमत न्यूज नेटवर्कगांधीनगर : गुजरातचे १८ वे मुख्यमंत्री म्हणून ६० वर्षीय भूपेंद्र पटेल यांना सोमवारी येथील सचिवालयाच्या हेलिपॅड मैदानावर दुपारी दोन वाजता राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी शपथ दिली. याच सोहळ्यात १६ मंत्र्यांनीही शपथ घेतली. यामध्ये ११ माजी मंत्र्यांचा समावेश आहे.

पटेल यांच्या मंत्रिमंडळात ८  कॅबिनेट आणि तेवढेच राज्यमंत्री आहेत. दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होणारे ते पहिले पाटीदार नेते आहेत. शपथविधीनंतर पंतप्रधान जनतेसमोर नतमस्तक झाले. यानंतर त्यांनी पटेल यांच्या मंत्रिमंडळाची भेट घेऊन त्यांच्यासोबत छायाचित्रे काढली. त्यांनी विजय रूपाणी यांच्याशीही चर्चा केली. शपथविधी सोहळ्याला भाजपचे प्रमुख नेते, तसेच केंद्रीय मंत्री आणि पक्षाची सत्ता असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. 

हार्दिक पटेल मंत्रिपदापासून वंचितनुकतेच भाजपमध्ये आलेले हार्दिक पटेल यांना भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळू शकले नाही. मंत्रिमंडळात घ्यायचे की नाही, याचा निर्णय पक्ष घेईल, कोणतीही जबाबदारी आली, तरी  ती पार पाडील, असे हार्दिक यांनी सकाळीच सांगितले होते.

गुजरातचे १८ वे मुख्यमंत्री म्हणून ६० वर्षीय भूपेंद्र पटेल यांनी सोमवारी शपथ दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही उपस्थिती होती. शपथविधीपूर्वी मोदी यांनी गुजरातमध्ये मोठा रोड शो  आयोजित केला होता, त्याला नागरिकांनी गर्दी केली होती.

टॅग्स :Bhupendra Patelभूपेंद्र पटेलGujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022