नव्या संसद भवनाचा भूमिपूजन समारंभ १० डिसेंबरला, पंतप्रधानांच्या उपस्थितीत कार्यक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2020 07:09 IST2020-12-06T04:22:32+5:302020-12-06T07:09:14+5:30
new Parliament House : नवे संसद भवन ६४,५०० चौरस मीटर क्षेत्रफळावर बांधले जाणार असून या कामासाठी ९७१ कोटी रुपये खर्च येणार आहे. जुन्या संसद भवनाच्या इमारतीला १०० वर्षे पूर्ण होत आहेत.

नव्या संसद भवनाचा भूमिपूजन समारंभ १० डिसेंबरला, पंतप्रधानांच्या उपस्थितीत कार्यक्रम
नवी दिल्ली : नव्या संसद भवनाचा भूमिपूजन समारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवार, १० डिसेंबर रोजी होणार आहे. हे बांधकाम २०२२ साली पूर्ण होईल, असे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शनिवारी सांगितले.
ते म्हणाले की, नवे संसद भवन ६४,५०० चौरस मीटर क्षेत्रफळावर बांधले जाणार असून या कामासाठी ९७१ कोटी रुपये खर्च येणार आहे. जुन्या संसद भवनाच्या इमारतीला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. याच सुमारास नवीन संसद भवनाच्या बांधकामासही सुरुवात होणार आहे. हे आत्मनिर्भर भारताचे निदर्शक आहे.
ओम बिर्ला यांनी सांगितले की, देशामध्ये जी सांस्कृतिक विविधता आहे, त्याचे चित्र नव्या संसद भवनात उमटणार आहे. देशाच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनी संसदेचे अधिवेशन नव्या संसद इमारतीत होईल, अशी आशा करूया. नव्या संसद भवनाची इमारत भूकंपरोधक असून तिथे १,२२४ खासदार एकत्र बसू शकतील, अशी व्यवस्था असेल. संसदेच्या दोन्ही सभागृहांतील खासदारांसाठी सध्याच्या श्रमशक्ती भवनाच्या जागेवर कार्यालये बांधण्यात येणार आहेत. नवीन संसद भवनाच्या बांधणीत २ हजार प्रत्यक्षपणे तर ९ हजार लोक अप्रत्यक्षरीत्या सहभागी होतील.