शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

माजी लष्करी अधिकाऱ्याच्या पत्नीचा बेसमेंटमध्ये सापडला मृतदेह; डॉक्टरकडे रिपोर्ट दाखवायला गेला होता पती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 17:19 IST

भोपाळमध्ये निवृत्त लष्करी अधिकाऱ्याच्या पत्नीचा मृतदेह बेसमेंटमध्ये आढळ्याने खळबळ उडाली आहे.

Bhopal Crime:मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये निवृत्त लष्करी अधिकाऱ्याच्या पत्नीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. माजी लष्करी अधिकाऱ्याच्या पत्नीने आत्महत्या केल्याचे म्हटलं जात आहे. पती डॉक्टरकडे रिपोर्ट दाखवण्यासाठी गेले होते. ते परत आले असता त्यांना पत्नीचा मृतदेह बेसमेंटमध्ये पडलेला दिसला. गेल्या सहा महिन्यांपासून त्या आजारी होती आणि त्यांना नैराश्याने ग्रासले होते, अशी माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद करुन पुढील तपास सुरु केला आहे.

भोपाळच्या टीटी नगरमध्ये राहणाऱ्या या महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली. मात्र महिलेचा मृतदेह बेसमेंटमध्ये पडलेला आढळून आला. पती डॉक्टरांना रिपोर्ट दाखवण्यासाठी गेला होता आणि जेव्हा ते परत आले तेव्हा त्यांना त्याची पत्नी बेसमेंटमध्ये मृतावस्थेत आढळली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. सध्या पोलिसांनी ही आत्महत्या असल्याचे म्हणत तपास सुरु केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, लष्करी अभियांत्रिकी सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी संजय मंगल हे आपल्या ६१ वर्षीय पत्नी अनिता यांच्यासोबत भोपाळच्या तुलसी टॉवरमध्ये राहत होते. अनिता या गेल्या ६ महिन्यांपासून आजारी होत्या. यामुळे त्या मानसिक तणावाखाली होत्या. शनिवारी संजय मंगल हे अनिता यांचे रिपोर्ट   दाखवण्यासाठी डॉक्टराकडे गेले होते. संजय यांनी परत येऊन दारावरची बेल वाजवली तेव्हा आतून कोणीच प्रतिसाद दिला नाही. संजय यांना वाटले की अनीता या शेजारच्या कोणाच्या तरी घरी गेल्या असाव्यात. त्यामुळे त्यांनी शेजाऱ्यांना अनिता यांच्याबद्दल विचारले. पण अनिता या शेजाऱ्यांच्या घरीही नव्हत्या. यानंतर त्यांनी बेसमेंटमध्ये जाऊन पाहिलं तेव्हा त्यांना अनिता यांचाचा मृतदेह दिसला.

रहिवाशांनी तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. संजय मंगल यांना दोन मुली असून त्या बाहेरगावी असतात. त्या भारतात आल्यानंतर अनिता यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, संजय मंगल निवृत्तीनंतर भोपाळ मेट्रोमध्ये कामाला लागले होते. तिथे ते तज्ञ म्हणून काम पाहत होते. पत्नीच्या सततच्या प्रकृतीच्या कारणामुळे त्यांनी तिची काळजी घेण्यासाठी मेट्रोमधील नोकरी सोडली होती. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस