शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
Daily Top 2Weekly Top 5

'मला मारण्यासाठी सुपारी देऊन ठेवली आहे', PM नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर मोठा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2023 00:54 IST

"भारतातील गरीब, मध्यमवर्ग, आदिवासी, दलित आणि ओबीसींसह प्रत्येक भारतीय आज मोदींचे सुरक्षा कवच झाला आहे."

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी काँग्रेससह विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, "काही लोकांनी मला मारण्यासाठी वेगवेगळ्या लोकांना सुपारी दिली आहे, पण भारतातील गरीब, मध्यमवर्ग, आदिवासी, दलित आणि ओबीसींसह प्रत्येक भारतीय आज मोदींचे सुरक्षा कवच झाला आहे. या लोकांनी २०१४ मध्ये मोदीची प्रतिमा मलिन करण्याची शपथ घेतली होती आणि आता त्यांनी शपथ घेतली आहे - 'मोदी तेरी कबर खुदेगी.' राणी कमलापती रेल्वे स्टेशन ते हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशन (नवी दिल्ली) दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला मोदींनी शनिवारी हिरवा झेंडा दाखवला. यानंतर ते उपस्थित लोकांना संबोधित करत होते.

मोदी म्हणाले, “आपल्या देशात असे काही लोक आहेत, ज्यांनी 2014 पासूनच निश्चय केला आहे, ते जाहीरपणेही बोलले आहेत, त्यांनी संकल्प केला आहे की, ते मोदींची छवी खराब करूनच राहतील. यासाठी या लोकांनी वेगवेगळ्या लोकांना सुपारी देऊन ठेवली आहे आणि स्वतःही मोर्चा सांभाळत आहेत. या लोकांना साथ देण्यासाठी काही लोक देशात आहेत, तर काही देशाबाहेर आहेत.’’ 

‘‘हे लोक सातत्याने मोदीची छबी खराब करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, भारतातील गरीब, मध्यम वर्ग, आदिवासी, दलित, आदींसह प्रत्येक भारतीय आज मोदींचे सुरक्षा कवच बनले आहे. यामुळेच हे लोक अधिक बिथरले आहेत आणि नवनवीन युक्त्या लढवत असतात. 

"मोदी म्हणजे एप्रिल फूल करत असेल" मोदींनी या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना आपल्या भाषणात काँग्रेसवरही निशाणा साधला. "जेव्हा या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला गेल्याची बातमी उद्या छापली जाईल तेव्हा आमचे काँग्रेसचे मित्र १ एप्रिलच्या निमित्तानं असं नक्की म्हणतील की मोदी आहे म्हणजे एप्रिल फूल बनवलं असेल. पण तुम्ही स्वत: आज सगळे पाहात आहात. १ एप्रिल रोजीच ही ट्रेन रवाना होत आहे. हे आपल्या कौशल्य, सामर्थ्य आणि आत्मविश्वासाचं प्रतिक आहे", असं नरेंद्र मोदी म्हणाले. 

स्वातंत्र्यानंतर काँग्रेसला आधीच निर्माण करण्यात आलेलं रेल्वे नेटवर्क हाती मिळालं होतं. इच्छा असती तर इतक्या वर्षात रेल्वेचा वेगानं विकास होऊ शकला असता. पण राजकीय फायद्यासाठी रेल्वेच्या विकासाचा बळी दिला जात होता. स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही उत्तर-पूर्व भागात रेल्वेचं नेटवर्क नाही. २०१४ साली जेव्हा मला देशाची सेवा करण्याची संधी मिळाली तेव्हाच मी ठरवलं होतं की आता असं चालणार नाही. रेल्वेचा कायापालट झालाच पाहिजे. गेल्या ९ वर्षात आम्ही सातत्यानं त्यादृष्टीनं काम केलं आहे आणि भारताच्या रेल्वे नेटवर्कला जगातील सर्वश्रेष्ठ नेटवर्क कसं बनवता येईल यादृष्टीनं आम्ही काम करत आहोत, असंही मोदी म्हणाले.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस