शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Koregaon Bhima: पाच जणांच्या अटकेविरोधातील याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालय देणार निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2018 10:56 IST

पाच जणांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज निर्णय

नवी दिल्ली: कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण निकाल येणार आहे. कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणात पाच कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. या अटकेला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. यावर आज न्यायालयाकडून निकाल सुनावण्यात येईल. कोरेगाव-भीमा  हिंसाचार प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली. या अटकेविरोधात इतिहासकार रोमिला थापर आणि अन्य चार कार्यकर्त्यानी याचिका दाखल केली होती. त्यावर आज निकाल दिला जाईल. याआधी न्यायालयानं पुढील सुनावणीपर्यंत आरोपींना अटक न करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे सध्या पाचही कार्यकर्ते नजरकैदेत आहेत. जानेवारी महिन्यात कोरेगाव-भीमामध्ये हिंसाचार झाला होता. या प्रकरणी हैदराबादमधून सामाजिक कार्यकर्ते वरवरा राव, फरिदाबादमधून सुधा भारद्वाज, दिल्लीमधून गौतम नवलखा यांना अटक केली होती. तर ठाण्यातून अरुण फरेरा आणि गोव्यातून वर्नान गोन्साल्विस यांना अटक करण्यात आली होती. या कारवाईत त्यांचे लॅपटॉप, पेन ड्राईव्ह आणि कागदपत्रं ताब्यात घेण्यात आली. पाच कार्यकर्त्यांच्या अटकेविरोधात रोमिला थापर यांच्यासह चार कार्यकर्त्यांनी याचिका दाखल केली. अटक करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांची सुटका करावी आणि या प्रकरणाची स्वतंत्रपणे चौकशी करावी, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली. यानंतर न्यायालयानं पाच कार्यकर्त्यांची मुक्तता करण्याते आदेश दिले. तेव्हापासून पाचहीजणांना नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. 'मतभिन्नता लोकशाहीचा सेफ्ट व्हॉल्व आहे. प्रेशर कुकरमध्ये सेफ्ट व्हॉल्व नसल्यावर कुकरचा स्फोट होऊ शकतो. त्यामुळेच लोकशाहीत मतभिन्नता असायला हवी,' असं न्यायालयानं पाचजणांची तुरुंगातून सुटका करण्याचे आदेश देताना म्हटलं होतं.

 

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारSupreme Courtसर्वोच्च न्यायालय