शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Bhima Koregaon: देवेंद्र सरकारला 'सर्वोच्च' दिलासा; 'त्या' पाच जणांच्या अटकेमागे राजकारण नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2018 12:25 IST

पाचही आरोपींची नजरकैदेत चार आठवड्यांनी वाढवली

नवी दिल्ली: कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणातील पाच आरोपींची नजरकैद सर्वोच्च न्यायालयानं आणखी चार आठवड्यांनी वाढवली आहे. कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी पुणे पोलिसांनी पाच जणांना देशभरातून अटक केली होती. ही कारवाई राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचा आरोप केला जात होता. मात्र ही कारवाई राजकीय हेतूनं करण्यात आलेली नाही, असं न्यायालयानं म्हटलं. पोलिसांनी कारवाईदरम्यान बळाचा गैरवापर केलेला नसल्याचंही न्यायालयानं निकालात म्हटलं. पुणे पोलिसांनी त्यांचा तपास पुढे चालू ठेवावा असे आदेश न्यायालयानं यावेळी दिले. पोलिसांनी केलेल्या अटकेच्या कारवाईच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याची आवश्यकता नाही, असं निकाल सुनावताना न्यायालयानं म्हटलं. कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणात पुणे पोलिसांनी पाच कार्यकर्त्यांना अटक केली होती. मात्र या आरोपींना तुरुंगात न ठेवता, नजरकैदेत ठेवण्याचे आदेश देत सर्वोच्च न्यायालयानं पोलिसांना धक्का दिला होता. या अटकेविरोधात इतिहासकार रोमिला थापर आणि अन्य चार कार्यकर्त्यांनी याचिका दाखल केली होती. त्यावर आज न्यायालयानं निकाल दिला आणि पाचही कार्यकर्त्यांची नजरकैद चार आठवड्यानं वाढवली. या काळात आरोपी कनिष्ठ न्यायालयात दाद मागू शकतात, असं न्यायालयानं म्हटलं. 

पाच कार्यकर्त्यांच्या अटकेविरोधात रोमिला थापर यांच्यासह चार कार्यकर्त्यांनी याचिका दाखल केली होती. अटक करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांची सुटका करावी आणि या प्रकरणाची स्वतंत्रपणे चौकशी करावी, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली. मात्र न्यायालयानं अटकेच्या कारवाईत हस्तक्षेप केला. याशिवाय अटक करण्यात आलेले आरोपी त्यांची चौकशी कोणी करायची ते ठरवू शकत नाही, अशा शब्दांमध्ये न्यायालयानं याचिकाकर्त्यांची कानउघाडणी केली. कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणात पुणे पोलिसांनी पाच कार्यकर्त्यांना अटक केली होती. हैदराबादमधून सामाजिक कार्यकर्ते वरवरा राव, फरिदाबादमधून सुधा भारद्वाज, दिल्लीमधून गौतम नवलखा यांना अटक केली होती. तर ठाण्यातून अरुण फरेरा आणि गोव्यातून वर्नान गोन्साल्विस यांना अटक करण्यात आली होती. या कारवाईत त्यांचे लॅपटॉप, पेन ड्राईव्ह आणि कागदपत्रं ताब्यात घेण्यात आली.  याआधीच्या सुनावणीत न्यायालयानं पाचही कार्यकर्त्यांची मुक्तता करण्याचे आदेश दिले होते. कार्यकर्त्यांना अटक न करता, नजरकैदेत ठेवलं जावं, अशा सूचना न्यायालयानं पोलिसांना दिल्या होत्या. त्यामुळे गेल्या महिन्याभरापासून पाचही कार्यकर्ते नजरकैदेत आहेत. आता ही नजरकैद चार आठवड्यांनी वाढवण्यात आली आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचार