शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर यांची तुरुंगातून मुक्तता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2018 06:19 IST

तुरुंगातून बाहेर येताच चंद्रशेखर यांचा भाजपावर हल्लाबोल

सहारणपूर: गेल्या वर्षी सहारणपूरमध्ये झालेल्या जातीय हिंसाचार प्रकरणात अटकेत असलेले भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर यांची सुटका करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमधीलयोगी आदित्यनाथ सरकारनं राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली चंद्रशेखर यांना अटक केली होती. मात्र शिक्षा पूर्णआधीच भाजपा सरकारनं त्यांची सुटका केली आहे. मध्यरात्री 2 वाजून 24 मिनिटांनी चंद्रशेखर यांची तुरुंगातून मुक्तता करण्यात आली. यानंतर त्यांनी आपल्या समर्थकांना संबोधित केलं. पुढील निवडणुकीत भाजपाचा पराभव करु, अशी गर्जना त्यांनी केली. चंद्रशेखर यांची शिक्षा नोव्हेंबरमध्ये पूर्ण होणार होती. मात्र उत्तर प्रदेशमधील भाजपा सरकारनं त्याआधीच त्यांची सुटका केली. तुरुंगातून बाहेर पडताच चंद्रशेखर यांनी आपल्या समर्थकांसह मोर्चा काढत भाजपावर निशाणा साधला. त्यावेळी त्यांच्या हातात संविधानाची एक प्रत होती. लढाई आता कुठे सुरू झाली आहे, असं त्यांनी यावेळी म्हटलं. लोकसभा निवडणुकीआधी भीम आर्मी आणि अनुसूचित जाती-जमातींची नाराजी दूर करण्यासाठी भाजपानं चंद्रशेखर यांची मुदतीआधीच सुटका केली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र तुरुंगातून बाहेर येताच चंद्रशेखर यांनी भाजपावर केलेला शाब्दिक हल्ला लक्षात घेता, हा डाव उलटण्याची शक्यतादेखील वर्तवण्यात येत आहे. उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात भीम आर्मीचं प्राबल्य आहे. अनुसूचित जाती-जमातींच्या आंदोलनाच्या माध्यमातून या भागात आपली पाळंमुळं घट्ट रोवण्याचा भीम आर्मीचा प्रयत्न आहे. कैराना आणि नूरपूरमधील पोटनिवडणुकीत भाजपाला पराभव पत्करावा लागला होता. भीम आर्मीमुळे या जागा भाजपाला गमवाव्या लागल्या, असं भाजपाचे या भागातील नेते खासगीत कबूल करतात. राज्याच्या पश्चिम भागातील अनुसूचित जाती-जमाती आणि मुस्लिम मतांची मोट बांधण्यात भीम आर्मीला यश आलं आहे. भाजपाच्या दृष्टीनं ही चिंतेची बाबा आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपा