रात्री भरते भूतांची जत्रा नार्वेत भरणार मंगळवारी मसणदेवीची जत्रा : नवसाला पावणारी देवी

By Admin | Updated: August 31, 2015 00:24 IST2015-08-31T00:24:30+5:302015-08-31T00:24:30+5:30

डिचोली : तळेवाडा-नार्वे येथील प्रसिद्ध मसणदेवीचा जत्रोत्सव मंगळवार दि़ 1 सप्टेंबर रोजी साजरा होत असून गोव्याच्या कानाकोपर्‍यातून शेकडो भाविक इथे येणार आहेत़ गोव्यात एकमेव ठिकाणी ही वैशिष्ट्यपूर्ण जत्रा र्शावणाच्या तिसर्‍या मंगळवारी साजरी होत असत़े

Bhatts will be filled in the night by the night of the month of Masandavi: Navasala Pavarari Devi | रात्री भरते भूतांची जत्रा नार्वेत भरणार मंगळवारी मसणदेवीची जत्रा : नवसाला पावणारी देवी

रात्री भरते भूतांची जत्रा नार्वेत भरणार मंगळवारी मसणदेवीची जत्रा : नवसाला पावणारी देवी

चोली : तळेवाडा-नार्वे येथील प्रसिद्ध मसणदेवीचा जत्रोत्सव मंगळवार दि़ 1 सप्टेंबर रोजी साजरा होत असून गोव्याच्या कानाकोपर्‍यातून शेकडो भाविक इथे येणार आहेत़ गोव्यात एकमेव ठिकाणी ही वैशिष्ट्यपूर्ण जत्रा र्शावणाच्या तिसर्‍या मंगळवारी साजरी होत असत़े
तळेवाडा-नार्वे येथे मसणदेवीचे छोटे मंदिर असून समोर एक पेड आह़े त्या ठिकाणी कार्ज‍याचा मोठा वृक्ष असून एखादी गरोदर महिला किंवा रजस्वला अवस्थेत मृत झाल्यास तिला या परिसरात आणून पुरले जाते व त्या अवगतीपासून बाधा होऊ नये यासाठी एक खिळा तांब्याच्या नाण्यासहित या कार्ज‍याच्या झाडाला ठोकण्याची परंपरा आह़े त्यामुळे मृतात्म्यांना त्रास होत नाही, अशी आख्यायिका असल्याची माहिती नवनाथ नाईक यांनी दिली़
भक्ताने एखादी मागणी केल्यास नवस केल्यावर तो पूर्ण झाल्यास सर्व कामना पूर्ण होतात, अशी भाविकांची र्शद्धा आहे आणि म्हणूनच या जत्रेला मोठी गर्दी लोटत़े
ज्यांना अपत्यप्राप्ती होत नाही त्यांनी नवस केल्यास तो पूर्ण होतो़ हे अतिशय जागृत देवस्थान असून इतर राज्यातूनही लोक दर्शनाला येतात, अशी माहिती हरीश्चंद्र नाईक यांनी दिली़
या ठिकाणी सजवण्यात आलेल्या मूर्तीची भाविक खणानारळाने ओटी भरतात़ काही लोक पाळणे वाहतात़ संपूर्ण दिवसभर भक्तांनी देवदर्शन घेतल्यावर बकरा सोडण्यात येतो़ पूर्वी बकरा मारण्याची पद्धत होती़
या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात फेरी भरत़े सायंकाळनंतर मात्र इथे कुणीच थांबायचे नाही़ रात्रीच्या वेळी इथे भूतांचा वावर असल्याची आख्यायिका आह़े त्यामुळे अधार पडताच इथे कुणीच थांबत नाहीत, असे दशरथ नार्वेकर यांनी सांगितल़े
भक्तांचा पूर्ण विश्वास असल्याने या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात गावातील, राज्यातील भक्तगण हजेरी लावतात़
मृत व्यक्तीला पुरण्यात आल्यानंतर इथे कार्ज‍याला एक खिळा मारला जातो़ त्यानंतर मृत व्यक्ती कुणालाही त्रास देत नाही व तिला मुक्तीही मिळते, अशी भावना आह़े
र्शावणातील तिसर्‍या मंगळवारी हा जत्रोत्सव साजरा केला जात असून शेकडो वर्षांपासून ही परंपरा आह़े देवीचा प्रसाद घेतला की वर्षभर राखण मिळत असल्याचे सावित्री पिळगावकर या महिलेने सांगितल़े
गोव्यात वैशिष्ट्यपूर्ण गणली जाणारी ही जत्रा नार्वेत मंगळवारी भरत असून भाविकांची मोठी गर्दी लोटणार आह़े
(प्रतिनिधी)


फोटो : जत्रोत्सवाची तयारी
नार्वे येथील मसणदेवीचे मंदिर
मसणदेवी
कार्ज‍याच्या झाडाला तांब्याच्या नाण्यावर ठोकलेले खिऴे (विशांत वझे)

Web Title: Bhatts will be filled in the night by the night of the month of Masandavi: Navasala Pavarari Devi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.