भारतींच्या पोलीस कोठडीत वाढ

By Admin | Updated: October 1, 2015 22:25 IST2015-10-01T22:25:31+5:302015-10-01T22:25:31+5:30

महानगर दंडाधिकारी न्यायालयाने पत्नीचा छळ केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेले आम आदमी पार्टीचे वादग्रस्त आमदार सोमनाथ भारती यांचा पोलीस

Bharti police custody increase | भारतींच्या पोलीस कोठडीत वाढ

भारतींच्या पोलीस कोठडीत वाढ

नवी दिल्ली : महानगर दंडाधिकारी न्यायालयाने पत्नीचा छळ केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेले आम आदमी पार्टीचे वादग्रस्त आमदार सोमनाथ भारती यांचा पोलीस कस्टडी रिमांड ४ आॅक्टोबरपर्यंत वाढवून दिल्याने भारती यांना आणखी तीन दिवसपर्यंत कस्टडीतील चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.
४१ वर्षीय भारती यांचा यापूर्वी देण्यात आलेला दोन दिवसांचा पोलीस कस्टडी रिमांड गुरुवारी संपला. त्यामुळे त्यांना महानगर दंडाधिकारी न्यायालयापुढे हजर करण्यात आले आणि न्यायालयाने पोलिसांची विनंती मान्य करीत भारती यांचा पोलीस कोठडी तीन दिवसांसाठी वाढविली. भारती यांना यापूर्वी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.

Web Title: Bharti police custody increase