शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

५ महिन्यांपासून सुरूय कोरोनाविरुद्धचा लढा; आता ३२वा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, डॉक्टर चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 1:22 PM

अधिक चांगल्या उपचारांसाठी महिलेला जयपूरला हलवण्यात येण्याची शक्यता

भरतपूर: राजस्थानच्या भरतपूर शहरातील अपना घर आश्रमात राहणारी महिला गेल्या ५ महिन्यांपासून कोरोना विरुद्ध लढत आहे. शारदा देवी यांचा ३२ वा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे डॉक्टर वर्ग चिंतेत आहे. ४ सप्टेंबरला शारदा देवी यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. तेव्हापासून त्यांचे ३२ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शारदा देवी यांना अधिक चांगले उपचार मिळावेत यासाठी जयपूरला हलवण्यात येणार होतं. मात्र अद्याप तरी याबद्दलचा निर्णय झालेला नाही.घसा कोरडा झाल्यास कोरोना संसर्गाचा धोका वाढतो? जाणून घ्या 'या' व्हायरल मेसेज मागचं सत्यभरतपूरच्या अपना घर आश्रमात राहात असलेल्या शारदा देवी गेल्या ५ महिन्यांपासून कोरोनाविरुद्ध लढत आहेत. ४ सप्टेंबरला त्यांना कोरोनाची लागण झाली. मात्र अद्याप त्या कोरोनामुक्त झालेल्या नाहीत. गेल्या ५ महिन्यांत त्यांच्या ३२ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्या सगळ्या पॉझिटिव्ह आल्या. डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही शारदा देवी बऱ्या झालेल्या नाहीत. त्यामुळे डॉक्टरदेखील चिंतेत आहेत. कोरोना टेस्टसाठी स्वॅब स्टिक नाकात टाकल्याने खरंच 'ही' गंभीर समस्या होते का?अपना घर आश्रमचे संचालक डॉ. बी. एम. भारद्वाज यांनी दिलेल्या माहितीनुसार, शारदा देवींच्या आई वडिलांचं निधन झालं आहे. त्यांना सासरच्या माणसांनी घराबाहेर काढलं आहे. त्यानंतर त्या अपना आश्रमात आल्या. त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. ४ सप्टेंबरला चाचणीचा अहवाल आला. तो पॉझिटिव्ह आला. त्यानंतर गेल्या पाच महिन्यांत ३२ वेळा शारदा देवींची कोरोना चाचणी करण्यात आली. या सगळ्या चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. शारदा देवी गेल्या ५ महिन्यांपासून कोरोना पॉझिटिव्ह आहेत. कोरोनाची लागण झालेले रुग्ण काही दिवसांत बरे होतात. मात्र शारदा देवी कोरोनामुक्त होत नसल्यानं डॉक्टरदेखील आश्चर्य चकित झाले आहेत. गेल्या ५ महिन्यांपासून कोरोना पॉझिटिव्ह असल्यानं शारदा देवींचं वजनदेखील वाढत आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या चिंतेत भर पडली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या