Fact Check : घसा कोरडा झाल्यास कोरोना संसर्गाचा धोका वाढतो? जाणून घ्या 'या' व्हायरल मेसेज मागचं सत्य

By Manali.bagul | Published: September 21, 2020 08:01 PM2020-09-21T20:01:03+5:302021-01-27T14:26:01+5:30

Fact Check : घशाच्या कोरडेपणामुळे कोरोना संसर्ग होऊ शकतो अशी ही पोस्ट होती. आज आम्ही तुम्हाला या पोस्टमागचं सत्य सांगणार आहोत. 

Coronavirus symptoms fact check having a dry throat maketo infections like covid 19 | Fact Check : घसा कोरडा झाल्यास कोरोना संसर्गाचा धोका वाढतो? जाणून घ्या 'या' व्हायरल मेसेज मागचं सत्य

Fact Check : घसा कोरडा झाल्यास कोरोना संसर्गाचा धोका वाढतो? जाणून घ्या 'या' व्हायरल मेसेज मागचं सत्य

googlenewsNext

अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल मेसेज मोठ्या प्रमाणावर फिरत असतात. गेल्या  सहा महिन्यांपासून कोरोना व्हायरसबाबत अनेक मेसेजेस व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर घश्यातील वेदना किंवा कोरडा पडल्यानं कोरोना संसर्गाचा धोका वाढतो अशी पोस्ट व्हायरल होत आहे. थायलंडच्या आरोग्य मंत्रालयाच्या वतीने प्रसारित करण्यात आलेली घशाच्या कोरडेपणामुळे कोरोना संसर्ग होऊ शकतो अशी ही पोस्ट होती. आज आम्ही तुम्हाला या पोस्टमागचं सत्य सांगणार आहोत. 

नवीन विषाणू घातक आहे. त्यामुळे या काळात तुमच्या घशाची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. तुमचा घसा कोरडा पडू देऊ नका. सतत पाणी पीत रहा. यामुळे तुमच्या शरीरामध्ये विषाणू प्रवेश करू शकणार नाही.' असा दावा या पोस्टच्या माध्यमातून करण्यात आला होता. परंतू ही माहिती खोटी असल्याचे समोर आलं आहे. 

पोस्टमागचं सत्य

थायलंडच्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे आरोग्य संचालक डॉ. सुथात छोटानापन यांनी सांगितले की, 'घसा कोरडा  झाल्याने व्हायरस शरीरात प्रवेश करतात हे म्हणणं चुकीचं आहे. या गोष्टीला काहीही अर्थ नाही. तसंच आरोग्य मंत्रालयाने या संदर्भात कोणतीही अधिकृत माहीती  दिलेली नाही.

चुलालॉंगकोर्न विद्यापीठातील रोग प्रतिबंधक आणि सार्वजनिक आरोग्य विभागातील साहाय्याक प्राध्यापक  डॉ. थिरा वोराटानारात यांनी सांगितले की, ''कोरडा घसा आपल्या शरीरातील व्हायरस वाढण्यास कारणीभूत ठरत नाहीत. घशाद्वारे व्हायरस शरीरात प्रवेश करू शकत नाहीत. पेशींद्वारे व्हायरस शरीरात प्रवेश करू शकतात. म्हणून घसा कोरडा पडला तर तुम्हाला कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे ही या मेसेजमध्ये सांगितलेली गोष्ट खरी नाही.''

भारतात का वेगाने वाढताहेत कोरोनाचे रुग्ण?, समोर आलं मोठं कारण

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून भारतामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. देशभरात आता दिवसाला सरासरी ९० हजारांहून अधिक रुग्ण सापडत आहेत.  भारतात कोरोनाच्या संसर्गाच्या वाढलेल्या वेगामागचे महत्त्वाचे कारण समोर आले आहे. देशातील कोरोनाच्या वाढत्या वेगामागे कोरोना विषाणूचे सर्वात संसर्गजन्य प्रतिरूप A2a आहे. कोरोनाच्या या प्रतिरूपाने अवघ्या काही दिवसांतच देशातील ७० टक्के रुग्णांना आपल्या विळख्यात घेतले आहे. 

आता A3i हे कोरोनाचे प्रतिरूप भारतातून हळूहळू नष्ट झाल्याच आश्चर्य वाटायला नको, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. मात्र आता A3i या प्रतिरूपाचे स्थान A2a या प्रतिरूपाने घेतले आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे कोरोनाचे हे प्रतिरूप अधिक वेगाने फैलावते. आता कोरोनाचे A2a हे रूप देशात मोठ्या प्रमाणात पसरले आहे. 

सीसीएमबीचे संचालक डॉ. राकेश कुमार यांच्या म्हणण्यानुसार वाटत असलेल्या भीतीप्रमाणे कोरोनाच्या A2a या रूपाने इतर जगाप्रमाणे भारतातही आपले हातपाय पसरले आहेत. मात्र संपूर्ण जगात पसरलेल्या विषाणूमधील एकाच प्रकारच्या जीनोममुळे एकाच प्राकरची लस आणि औषध या म्युटेशनविरोधात परिणामकारक ठरेल. मात्रा कोरोनाचे A2a हे प्रतिरूप A3i या प्रतिरूपापेक्षा अधिक धोकादायक आहे किंवा नाही याबाबत अभ्सासातून स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र A2a या प्रतिरूपाच्या संसर्गाचा वेग हा खूप अधिक असल्याचे समोर आले आहे. आता जोपर्यंत प्रभावी लस विकसित होत नाही तोपर्यंत कोरोनाच्या A2a या प्रतिरूपापासून वाचणे हाच एकमेव उपाय असेल.

हे पण वाचा-

पोटाच्या रोजच्या तक्रारी ठरू शकतात IBD समस्येचं कारण; वाचा लक्षणं आणि उपाय

भय इथले संपत नाही! चीनमध्ये नव्या माहामारीचा शिरकाव; आत्तापर्यंत हजारो लोकांना संसर्ग

तुम्हालाही अचानक BP चा त्रास होतो? तज्ज्ञांनी सांगितले 'बीपी' नियंत्रणात ठेवण्याचे सोपे उपाय

भारतातही कोरोनाची लस मोफत मिळणार? अमेरिकेने केली मोठी घोषणा

आरोग्यदायी दुधीच्या सालीचे 'हे' फायदे वाचाल; तर फेकून देताना १० वेळा विचार कराल

Web Title: Coronavirus symptoms fact check having a dry throat maketo infections like covid 19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.