शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
6
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
7
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
8
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
9
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
10
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
11
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
12
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
13
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
14
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
15
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
17
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
18
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
19
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
20
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?

‘शीशमहल’ ढासळला, दिल्लीत कमळ फुलले; भाजपाला ४० जागांचा फायदा, 'आप'ला बसला फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 06:17 IST

नरेंद्र मोदींच्या जादूसमोर अरविंद केजरीवालांची आप झाली साफ; २७ वर्षांनी भाजप सत्तेत; काँग्रेसला फोडता आला नाही भोपळा

चंद्रशेखर बर्वेनवी दिल्ली : सत्ताधारी आम आदमी पक्षाला भुईसपाट करीत भारतीय जनता पक्षाने दिल्ली विधानसभेवर भगवा फडकविला आहे. भाजपने ४८ जागांवर दणदणीत विजय मिळविला आहे. तर आपला केवळ २२ जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेस पक्षाला या निवडणुकीतही खाते उघडता आलेले नाही. 

भाजपने दिल्लीची निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लढविली होती. तर, गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणुकीचे व्यवस्थापन सांभाळले होते. भाजपने निवडणुकीच्या प्रचारात भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांसह खासदारांची फौज उतरविली होती. यात आपचे पानिपत झाले.  भाजपचे प्रवेश वर्मा यांनी नवी दिल्ली मतदारसंघातून ३० हजार ८८ मते मिळवत अरविंद केजरीवाल यांचा ४०८९ मतांनी पराभव केला. केजरीवाल यांना २५९९९ मते मिळाली. 

दिल्ली निवडणुकांत भाजप, मित्रपक्षांना मिळालेला विजय हा विकास, उत्तम कारभाराला मिळालेली पोचपावती आहे. दिल्लीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आमचे सरकार कसून प्रयत्न करेल.- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

मुख्यमंत्रिपदासाठी कोण चर्चेत?

प्रवेश  वर्मा : माजी खासदार तथा भाजपचे दिल्लीतील प्रमुख नेत्यांपैकी एक. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिबसिंह वर्मा यांचे ते पुत्र आहेत. त्यांनी केजरीवाल यांचा पराभव केला.

विजेंद्र गुप्ता : दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष. आपचे वर्चस्व असूनही २०१५, २०२० मध्ये त्यांनी यश मिळविले होते. दिल्ली विधानसभेत त्यांनी विरोधी पक्षनेतेपद सांभाळले आहे.

सतीश उपाध्याय : भाजपचा दिल्लीतील महत्त्वाचा चेहरा. ते पूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष, दिल्ली युवा मोर्चाचे अध्यक्ष आणि एनडीएमसीचे उपाध्यक्ष होते. प्रशासकीय अनुभवासह त्यांनी पक्षसंघटनेत विविध पदांवर काम केले आहे.

आशिष सूद : भाजपचा दिल्लीतील पंजाबी चेहरा मानले जातात. ते दिल्ली भाजपचे सरचिटणीस होते. गोवा, काश्मीरमध्ये भाजपच्या संघटनात्मक गोष्टींची काही जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

जितेंद्र महाजन : जितेंद्र महाजन हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत. त्यानंतर ते राजकारणात आले. रोहतास नगर मतदारसंघात आपच्या उमेदवार सरिता सिंह यांचा त्यांनी पराभव केला.

सहापट विजयी उमेदवार

भाजपने २०२०च्या तुलनेत आता सहा पटीने विजय मिळविला आहे. २०२०मध्ये भाजपचे आठ आमदार निवडून आले होते. आता भाजपचे ४८ आमदार निवडून आले आहेत. भाजपला ४० जागांचा फायदा झाला आहे. आपला ४० जागांचा फटका बसला.  भाजपला ४५.५६ टक्के मते मिळाली असून २०२० च्या तुलनेत ९ टक्क्यांची वाढ झाली आहे. आपला ४३.५७ टक्के मिळाली आहेत. काँग्रेसला ६.३४ टक्के मते मिळाली.

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025BJPभाजपाArvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी