Bharat Bandh : "शेतकरी घर सोडून 10 महिन्यांपासून रस्त्यावर पण आंधळ्या, बहिऱ्या सरकारला काहीच दिसत नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 08:18 PM2021-09-27T20:18:31+5:302021-09-27T20:33:27+5:30

Bharat Bandh And Rakesh Tikait : "हे तीन राज्यांचे आंदोलन असल्याचे म्हणणाऱ्यांनी डोळे उघडून पाहावं. पूर्ण देश शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे. सरकारने शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवावा"

Bharat Bandh rakesh tikait says today bharat bandh is slap for those who describe movement of 3 states | Bharat Bandh : "शेतकरी घर सोडून 10 महिन्यांपासून रस्त्यावर पण आंधळ्या, बहिऱ्या सरकारला काहीच दिसत नाही"

Bharat Bandh : "शेतकरी घर सोडून 10 महिन्यांपासून रस्त्यावर पण आंधळ्या, बहिऱ्या सरकारला काहीच दिसत नाही"

नवी दिल्ली - भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी संयुक्त किसान मोर्चाने पुकारलेला आजचा भारत बंद (Bharat Bandh) पूर्णपणे यशस्वी झाला. आपला संताप व्यक्त करण्यासाठी देशभरातील शेतकरी रस्त्यावर उतरले. देशातील हजारो ठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. शेतकऱ्यांबरोबरच कामगार, व्यापारी, कर्मचारी संघटनांचाही पाठिंबा मिळाला. देशातील राजकीय पक्षांनीही बंदला पाठिंबा दिला असा दावा  केला आहे. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत शेतकरी बंदला पाठिंबा मिळाला. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कुठेही हिंसक झडप झाली नाही. यासाठी देशातील शेतकरी, मजूर आणि नागरिकांचे राकेश टिकैत यांनी आभार मानले.

"हे तीन राज्यांचे आंदोलन असल्याचे म्हणणाऱ्यांनी डोळे उघडून पाहावं. पूर्ण देश शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे. सरकारने शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवावा. उत्तर प्रदेशात वाढवलेले ऊसाचे दर हे शेतकऱ्यांची चेष्टा करणारे आहेत. त्याविरोधातही लवकरच रस्त्यावर आंदोलन करण्यात येईल" असा इशारा राकेश टिकैत यांनी दिला आहे. "भारत बंद दरम्यान स्वाभाविकपणे नागरिकांना त्रास झाला असेल. पण एक दिवस शेतकऱ्यांच्या नावे, असं समजून त्यांनी विसरून जावं. शेतकरी आपली घरे सोडून 10 महिन्यांपासून रस्त्यावर उतरले आहेत. पण आंधळ्या आणि बहिऱ्या सरकारला काहीच दिसत नाही किंवा ऐकायला येत नाही. लोकशाहीत निषेध करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही."

"शेतकऱ्यांचे प्रश्न लवकरात लवकर सोडवावेत"

"शेतकरी रिकाम्या हाताने घरी परततील, या भ्रमात त्यांनी राहू नये. आजूनही शेतकरी कायदे मागे घेण्याच्या मागणीवर ठाम आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न लवकरात लवकर सोडवावेत" असं राकेश टिकैत यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. भारतीय किसान युनियनच्या भानु गटाने राकेश टिकैत (Rakesh Tikait) आणि भारत बंद करणाऱ्या शेतकरी नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भारतीय किसान युनियन भानु गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष भानु प्रताप सिंह (Bhanu Pratap Singh) यांनी राकेश टिकैत यांनी पुकारलेल्या आजच्या भारत बंदवर निशाणा साधत हा तालिबानी बंद असल्याचं म्हटलं आहे. 

"भारत बंद करून राकेश टिकैत यांना दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन द्यायचे आहे का?"

"शेतकरी नेत्यांच्या या भारत बंदचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल. भारत बंद करून राकेश टिकैत यांना दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन द्यायचे आहे का? तालिबान या दहशतवादी संघटनेने अफगाणिस्तानवर कब्जा केला. राकेश टिकैत यांनाही भारतात अशाच प्रकारच्या कारवाया वाढवायच्या आहेत. त्यांचा हेतू योग्य वाटत नाही" असा गंभीर आरोप अध्यक्ष भानु प्रताप सिंह यांनी केला आहे. तसेच "राकेश टिकैत स्वतःला शेतकरी नेता म्हणवतात आणि नंतर भारत बंदची घोषणा करतात. मात्र, यामुळे अर्थव्यवस्था आणि शेतकऱ्यांवर परिणाम होतो. याचा कोणाला फायदा होईल? अशा प्रकारचे आंदोलनं सुरू ठेवून ते तालिबानच्या पावलावर पाऊल टाकत आहेत" असंही म्हटलं आहे. 

Web Title: Bharat Bandh rakesh tikait says today bharat bandh is slap for those who describe movement of 3 states

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.