शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
3
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
4
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
5
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
6
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
7
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
8
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
9
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
10
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
11
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
13
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
14
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
15
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
16
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
17
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
18
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
19
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
20
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल

Bharat Bandh: आरक्षणविरोधी आंदोलनाला हिंसक वळण; अनेक भागांमध्ये जाळपोळीच्या घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2018 12:32 PM

आरक्षण समर्थक आणि विरोधक भिडल्यानं तणाव

पाटणा: शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमधील जातीवर आधारित आरक्षणाविरोधात देण्यात आलेल्या भारत बंदच्या हाकेला बिहारमध्ये हिंसक वळण लागले आहे. बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये हिंसाचार झाला आहे. अनेक भागांमध्ये लोक रस्त्यावर उतरले आहेत. काही ठिकाणी हिंसक झालेल्या जनसमुदायाने जाळपोळदेखील केली आहे. राजगीरहून दिल्लीला जाणारी श्रमजीवी एक्स्प्रेस आंदोलकांनी आरा भागात रोखली आहे. आणखीही अनेक ठिकाणी एक्स्प्रेस गाड्या अडवण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. आरामध्ये जातीय आरक्षणाचे समर्थक आणि विरोधक आमनेसामने आले. यावेळी गोळीबारही झाला. त्यामध्ये ६-७ पोलीस कर्मचारी जखमी झाले. याशिवाय आरा-बक्सर रस्त्यावरही आंदोलन सुरु आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. हिंसाचाराच्या घटनांनंतर आरामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आरक्षणाविरोधात करण्यात आलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या काही तरुणांनी बिहारच्या भोजपूरमध्ये रस्ता रोखला आहे. याशिवाय अनेक ठिकाणी जाळपोळदेखील झाली आहे.  कैमूर जिल्ह्यातील नॅशनल हायवे २१९ वर आंदोलक तरुणांनी आरक्षणाविरोधात जोरदार घोषणाबाजी करुन हायवे रोखला आहे. मुझफ्फरपूरमध्येही पाटणा हायवे रोखण्यात आला आहे. अॅट्रॉसिटी कायद्यात सर्वोच्च न्यायालयाने सुचवलेल्या बदलांविरोधात २ एप्रिल रोजी दलित संघटनांनी भारत बंदची हाक दिली होती. या भारत बंद दरम्यान उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये हिंसाचार झाला होता. याच बंदला उत्तर म्हणून जातीवर आधारित आरक्षणाविरोधात काही संघटनांनी आज भारत बंदची हाक दिली. त्या पार्श्वभूमीवर राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली. अधिकृतपणे कोणत्याही मोठ्या संघटनेकडून जाहीरपणे भारत बंदची हाक देण्यात आलेली नाही. मात्र तरीही सोशल मीडियाच्या माध्यमातून भारत बंदचे मेसेज मोठ्या संख्येने पसरवण्यात आले होते.   

टॅग्स :Bharat Bandhभारत बंदAtrocity Actअॅट्रॉसिटी कायदा