शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
2
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
3
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
4
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
5
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
6
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
7
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
8
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
9
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
10
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
11
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
12
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
13
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
14
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
15
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
16
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
17
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
18
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
19
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
20
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'

भागवत म्हणाले, मंदिर वही बनाएंगे; लोकांनी विचारले तारीख कब बताएंगे 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2019 5:46 PM

मोहन भागवत यांनी आज राम मंदिर अयोध्येतील राम जन्मभूमीवरच बांधण्याचा पुनरुच्चार करताच उपस्थित लोकांनी मंदिर कधी बांधणार याची तारीख पण सांगा, अशा घोषणा देण्यास सुरुवात केली

ठळक मुद्देमोहन भागवत म्हणाले की, रामजन्मभूमीवरच भव्य राम मंदिराची निर्मिती होईलमोहन भागवत यांनी आज राम मंदिर अयोध्येतील राम जन्मभूमीवरच बांधण्याचा पुनरुच्चार करताच उपस्थित लोकांनी मंदिर कधी बांधणार याची तारीख पण सांगा, अशा घोषणा देण्यास सुरुवात केली

प्रयागराज - कुंभमेळा सुरू असलेल्या प्रयागराज येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी आज राम मंदिर अयोध्येतील राम जन्मभूमीवरच बांधण्याचा पुनरुच्चार केला. त्यावेळी उपस्थित लोकांनी मंदिर कधी बांधणार याची तारीख सांगा, अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यामुळे कार्यक्रमात गोंधळ झाला. प्रकरण आयोजक आणि उपस्थितांमध्ये हाणामारीपर्यंत गेले. प्रयागराज येथील एका कार्यक्रमात मोहन भागवत म्हणाले की, ''रामजन्मभूमीवरच भव्य राम मंदिराची निर्मिती होईल. आता ते कसे बांधायचे हे सरकारने ठरवले पाहिजे. जर सरकारने राम मंदिराबाबत सकारात्मक पावले उचलली तर भगवान रामाचा आशीर्वाद मिळेल. राम मंदिराबाबत सरकारची भूमिका स्पष्ट आहे याची आम्हाला जाणीव आहे. तसेच राम मंदिराची निर्मिती लवकरात लवकर सुरुवात होईल, अशी अपेक्षा आहे.''यावेळी राम मंदिरावरून आक्रमक पवित्रा घेणाऱ्यांनाही भागवत यांनी टोला लावला, ते म्हणाले. ''केवळ एकदा कार सेवा करून राम मंदिराची बांधणी पूर्ण होणार नाही. दम असेल तर कारसेवा करा  आणि नसेल तर सन्मानाने माघारी फिरा. संघ मंदिर बांधणीसाठी शक्ती पणाला लावेल. अयोध्येत केवळ भव्य राम मंदिरच बनेल.'' 

''राजकीय वर्तुळात काही घडो, राम मंदिर बांधले जावे अशी जनतेची इच्छा आहे. तीन चार महिन्यांत निर्णय झाला तर होईल. अन्यथा चार महिन्यांनंतर बांधकामाला सुरुवात होईल. सरकारने कोर्टात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. '' असे मोहन भागवत यांनी सांगितले. दरम्यान, भागवत यांनी हे वाक्य उच्चारताच उपस्थितांनी मंदिर बांधणीची तारीख सांगा, अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. आयोजकांनी घोषणा देणाऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पण प्रकरण हाणामारीपर्यंत गेले.  

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याMohan Bhagwatमोहन भागवत