Bhagwant Mann "गन आणि गँगस्टर कल्चर दाखवल्यावर कडक कारवाई होणार", भगवंत मान यांचा गायकांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 10:24 AM2022-05-13T10:24:29+5:302022-05-13T10:30:16+5:30

Bhagwant Mann On Punjabi Singers: हिंसेला प्रोत्साहन देणारे गाणे तयार केल्यावर कारवाई होणार, असा इशारा CM भगवंत मान यांनी पंजाबी गायकांना दिला आहे.

Bhagwant Mann: "Strict action will be taken against those who show gun and gangster culture in songs," warned Bhagwant Mann | Bhagwant Mann "गन आणि गँगस्टर कल्चर दाखवल्यावर कडक कारवाई होणार", भगवंत मान यांचा गायकांना इशारा

Bhagwant Mann "गन आणि गँगस्टर कल्चर दाखवल्यावर कडक कारवाई होणार", भगवंत मान यांचा गायकांना इशारा

googlenewsNext

Bhagwant Mann On Punjabi Singers: भगवंत मान (Bhagwant Mann) पंजाबचे मुख्यमंत्री झाल्यापासून एका पाठोपाठ एक मोठ निर्णय घेताना दिसत आहेत. यातच आता मान यांनी पंजाबी गायकांना कडक शब्दात इशारा दिलाय. गाण्यांमध्ये 'गन कल्चर' आणि 'गँगस्टर कल्चर' दाखवल्यावर कारवाई होईल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

पंजाबींचा आदर करा - भगवंत मान
बहुतांशी पंजाबी गाणी बंदूक आणि गुंड संस्कृतीला प्रोत्साहन देतात, त्यावर भगवंत मान यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी पंजाबी गायकांना इशारा दिला की, त्यांनी या गन क्लचरची ​​जाहिरात करणे थांबवावे. तसेच गाण्यातून कोणत्याही प्रकारे द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करू नये, असेही सांगितले. यासोबतच, गायकांना त्यांच्या गाण्यात पंजाब आणि पंजाबींचा आदर करण्याचे आवाहन केले. गाण्यांद्वारे हिंसेला प्रोत्साहन देणाऱ्या अशा गायकांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. 

माजी मुख्यमंत्री अमरिंदर यांचाही विरोध होता
भगवंत मान यांनी ड्रग्जच्या मुद्द्यावर डीजी आणि एसएसपी यांच्यासोबत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा मुद्दा मांडला. गेल्या वर्षी पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी एका पंजाबी गायकाच्या अटकेचे समर्थन केले होते. तो त्याच्या गाण्यांमध्ये बंदूक आणि गुंड संस्कृतीचा प्रचार करायचा.

Web Title: Bhagwant Mann: "Strict action will be taken against those who show gun and gangster culture in songs," warned Bhagwant Mann

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.