शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

Bhagwant Mann: पंजाब सरकारचा आणखी एक मोठा निर्णय, आमदारांना एकच पेन्शन मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 15:33 IST

पंजाब सरकारचे अनेक मोठे निर्णय प्रस्तावित असल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत

चंडीगड - आम आदमी पक्षाचा (AAP) पंजाब विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय झाला. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Maan) यांनी सत्तेवर येताच मोठ-मोठे निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. पंजाबमध्ये 35,000 कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम स्वरुपी नोकरीवर घेण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी मंगळवारी केली. त्यानंतर, आता माजी आमदारांना केवळ एकच टर्मची पेन्शन देण्यात येणार असल्याचा निर्णयही पंजाब सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज याची घोषणा केली. 

पंजाब सरकारचे अनेक मोठे निर्णय प्रस्तावित असल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत. त्यातीलच एक मोठी बाब म्हणून पंजाबच्या माजी आमदारांची, मंत्र्यांची पेन्शन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे दावे सोशल मीडियात व्हायरल झाले होते. मात्र, आता माजी आमदारांच्या पेन्शनबाबत कोणता निर्णय घेण्यात आला, हे स्वत: पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. 

''आमदार हे हात जोडून लोकांना विनंती करतात की, आम्हाला सेवा करण्याची संधी द्या. पण, सध्या 4,5 किंवा 6 वेळा आमदार बनले आहेत. जे सध्या काही कारणास्तव (तिकीट न मिळाल्याने, पराभूत झाल्याने) विधानसभेत नाहीत. त्यांना लाखो रुपयांची पेन्शन मिळते, कुणाला महिन्याला 3.5 लाख रुपये मिळतात, कुणाला 4.5 लाख, कुणाला सव्वा 5 लाख रुपयेही दरमहा पेन्शन मिळते. विशेष म्हणजे काही खासदार आहेत, जे पूर्वी आमदार होते. ते आमदार आणि खासदारकीचीही पेन्शन घेत आहेत'', त्यामुळे, पंजाब सरकारने एक मोठा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सांगितले.  पंजाब सरकारच्या निर्णयानुसार आमदार एकदा व्हा, दोनदा व्हा, चारदा व्हा किंवा 10 वेळा आमदार व्हा. पण, आमदारकीची पेन्शन ही केवळ एक टर्मचीच मिळणार आहे. कारण, सेवा करणाऱ्यांना कुठलिही पेन्शन योग्य नाही. पंजाब सरकारच्या तिजोरीवर या पेन्शन योजनांमुळे मोठा आर्थिक भार पडत होता. त्यामुळे, केवळ 1 टर्म पेन्शनचा हा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सांगितले. अखेर इन्कलाब झिंदाबाद.. असेही त्यांनी म्हटले. 

पंजाबमधील आमदरांचं सध्याचं पेन्शन स्वरुप कसं 

सध्याच्या घडीला आमदार म्हणून एकदा निवडून येणाऱ्या व्यक्तीस आयुष्यभरासाठी दरमहा ७५,१५० रुपये पेन्शन स्वरुपात मिळतात. तोच आमदार जर एक पेक्षा अधिक वेळा निवडून आला असेल, तर त्या प्रत्येक टर्मच्या पेन्शनची ६६% रक्कम त्याला दरमहा मिळते. बातमीनुसार माजी मुख्यमंत्री राजिंदर कौर भट्टल, काँग्रेस नेते लाल सिंह, माजी मंत्री सर्वन सिंह फिल्लौर यांना दरमहा ३.२५ लाख रुपये पेन्शन रक्कम म्हणून मिळतात. ज्येष्ठ नेते बीएस भुंडर यांना दरमहा २.७५ लाख रुपये तर एस एस धिंडसा यांना २.२५ लाख रुपये निवृत्ती वेतनाच्या स्वरुपात मिळत असतात.

माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांची विनंती

तब्बल ५ वेळा मुख्यमंत्री राहिलेले प्रकाश सिंह बादल (Parkash Singh Badal) यांनी सरकारकडे त्यांना मिळणारी पेन्शनची रक्कम लोकोपयोगी कामासाठी वापरावी अशी विनंती केलीय. त्यांना मिळणारी दरमहा रक्कम ५,७६,१५० रुपये एवढी आहे. 

टॅग्स :AAPआपBhagwant Mannभगवंत मानMLAआमदारPunjabपंजाब