शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पंजाबमधील तुरुंगात आता VIP सेल नसणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2022 14:44 IST

Bhagwant Mann : भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील सरकारने व्हीआयपी (VIP) कल्चर संपवण्यासंदर्भात आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. यानुसार, आता पंजाबच्या (Punjab) तुरुंगातील व्हीआयपी कल्चर संपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पंजाब : भगवंत मान (Bhagwant Mann) पंजाबचे मुख्यमंत्री झाल्यापासून एका पाठोपाठ एक मोठे निर्णय घेताना दिसत आहेत. गाण्यांमध्ये 'गन कल्चर' आणि 'गँगस्टर कल्चर' दाखवल्यावर कारवाई होईल, असा इशारा नुकताच मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दिला होता. त्यानंतर आता पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील सरकारने व्हीआयपी (VIP) कल्चर संपवण्यासंदर्भात आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. यानुसार, आता पंजाबच्या (Punjab) तुरुंगातील व्हीआयपी कल्चर संपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुख्यमंत्री भगवंत मान सरकारच्या नव्या आदेशानुसार, पंजाबमधील तुरुंगांमध्ये बांधण्यात आलेले व्हीआयपी सेल पूर्णपणे बंद करण्यात येणार आहेत. दरम्यान, तुरुंगातून मोबाईल जप्त होण्याच्या वाढत्या प्रकरणांवर सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. यासाठी पंजाबमधील तुरुंगांमध्ये शोध मोहीम सुरू आहे. "आमचे सरकार स्थापन झाल्यापासून पंजाबमधील सर्व तुरुंगांतून 710 मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत", असे मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले. तसेच, "काहीही झाले तरी मी आणि आमचे सरकार यापुढे तुरुंगातून काळे धंदे सुरू होऊ देणार नाही", असेही मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सांगितले.  

दरम्यान, पंजाबच्या तुरुंगात तैनात असलेले वरिष्ठ अधिकारी आणि तुरुंगातील सर्व कर्मचाऱ्यांना सतत सावध केले जात आहे. दुसरीकडे, कामात हलगर्जीपणा करणाऱ्या काही अधिकाऱ्यांना आम्ही निलंबित केले आहे. सुधारगृह असो की जेल, आता खर्‍या अर्थाने सर्व गुन्हेगारांना सुधारू, असे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले. 

पंजाबींचा आदर करा - भगवंत मानबहुतांशी पंजाबी गाणी बंदूक आणि गुंड संस्कृतीला प्रोत्साहन देतात, त्यावर भगवंत मान यांनी नुकताच आक्षेप घेतला आहे. त्यांनी पंजाबी गायकांना इशारा दिला की, त्यांनी या गन क्लचरची ​​जाहिरात करणे थांबवावे. तसेच गाण्यातून कोणत्याही प्रकारे द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करू नये, असेही सांगितले. यासोबतच, गायकांना त्यांच्या गाण्यात पंजाब आणि पंजाबींचा आदर करण्याचे आवाहन केले. गाण्यांद्वारे हिंसेला प्रोत्साहन देणाऱ्या अशा गायकांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :PunjabपंजाबBhagwant Mannभगवंत मानjailतुरुंग