शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Bhagwant Maan: 'मान'नीय मुख्यमंत्री! भगवंत मान यांनी घेतली पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 14:32 IST

Bhagwant Maan:या शपथविदी सोहळ्याला अरविंद केजरीवाल यांच्यासह आपचे सर्व नेते उपस्थित होते.

चंदीगड: AAP चे भगवंत मान (Bhagwant Maan) पंजाबचे 17 वे मुख्यमंत्री बनले आहेत. आज भगवंत मान यांनी शहीद भगतसिंग यांचे गाव खटखड कलां येथे पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल बनवारी लाल पुरोहित यांनी मान यांना गोपनियतेची शपथ दिली. यावेळी मंचावर आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह आपचे अनेक नेते उपस्थित होते.

हा भव्य शपथविधी सोहळा 100 एकराच्या परिसरात झाला. यातील 44 एकरवर मंडप उभारण्यात आला होता. या शपथविधी सोहळ्याला सुमारे 3 ते 4 लाख लोक उपस्थित होते. सोहळ्यात 50 हजार लोकांच्या बसण्याची सोय केली होती, तर उर्वरित ठिकाणी एलईडी बसविण्यात येणार होते. सोहळ्याच्या सुरक्षेसाठी आठ हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले.

पंजाब निवडणुकीत 'आप'ने 92 जागा जिंकल्या पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने मोठा विजय मिळवला आणि दोन तृतीयांश बहुमताने सत्ता स्थापन केली. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निकालांनुसार, आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये 117 जागांपैकी 92 जागा जिंकल्या, तर काँग्रेसला केवळ 18 जागा जिंकता आल्या. शिरोमणी अकाली दल तीन जागा आणि भाजपने दोन जागा जिंकल्या, तर बसपने एक जागा जिंकली आणि अपक्षांनीही एक जागा जिंकली.

विनोदी कलाकार ते मुख्यमंत्रीभगवंत मान यांच्या करिअरची सुरुवात कॉमेडियन म्हणून झाली होती. त्यांनी 2008 मध्ये कपिल शर्मासोबत 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या टीव्ही शोमध्ये भाग घेतला होता. त्या शोमधून भगवंत मान यांना खूप प्रसिद्धी मिळाली. कॉमेडीसोबतच भगवंत यांना अभिनयातही खूप रस होता. त्यांनी अनेक चित्रपटातही काम केले आहे. 

पंजाब पीपल्स पार्टीमधून राजकीय कारकिर्दीची सुरुवात प्रकाशसिंग बादल यांचे पुतणे आणि तत्कालीन अर्थमंत्री मनप्रीत सिंग बादल यांनी मार्च 2011 मध्ये पंजाबमध्ये पीपल्स पार्टीची स्थापना केली तेव्हा भगवंत मान यांनी राजकारणात प्रवेश केला आणि पीपीपीच्या संस्थापक नेत्यांपैकी एक बनले. फेब्रुवारी 2012 मध्ये पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत, भगवंत मान यांनी लेहरागागा मतदारसंघातून पीपीपी उमेदवार म्हणून निवडणूक लढवली, परंतु त्यांचा पराभव झाला.

भगवंत मान यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केलापीपल्स पार्टीला विधानसभा निवडणुकीत एकही जागा मिळाली नाही, त्यानंतर मनप्रीत सिंग बादल यांनी काँग्रेसमध्ये जाण्याची तयारी सुरू केली. दुसरीकडे, भगवंत मान यांनी काँग्रेसमध्ये जाण्याऐवजी वेगळा मार्ग निवडला आणि 2014 मध्ये आम आदमी पार्टीमध्ये (आप) प्रवेश केला.

सलग 2 लोकसभा निवडणुकीत विक्रमी विजय2014 च्या लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला पंजाबमध्ये प्रचंड पाठिंबा मिळाला आणि पक्षाने भगवंत मान यांच्या जागेसह चार जागा जिंकल्या. या निवडणुकीत भगवंत मान हे आम आदमी पक्षाच्या प्रचाराचा चेहरा होते आणि ते संगरूर लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले. यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही भगवंत मान विजयी झाले.

 

टॅग्स :Bhagwant Mannभगवंत मानPunjabपंजाबChief Ministerमुख्यमंत्रीAAPआप