शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

Bhagat Singh Koshyari: “मला विमानातून उतरवलं, नियतीनं उद्धव ठाकरेंना खुर्चीवरुन खाली खेचलं”: भगतसिंह कोश्यारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 19:14 IST

Bhagat Singh Koshyari: उद्धव ठाकरेंना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बळीचा बकरा बनवले, असे भगतसिंह कोश्यारींनी म्हटले आहे.

Bhagat Singh Koshyari: केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्हाबाबतचा निर्णय शिंदे गटाच्या बाजून दिल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. तत्पूर्वी, भगतसिंह कोश्यारी यांचा राज्यपालपदाचा राजीनामा मंजूर करण्यात आला आणि त्यांच्या जागी रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली. राज्यातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भगतसिंह कोश्यारी यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना उद्धव ठाकरेंनी मला विमानातून उतरवले होते आता नियतीने उद्धव ठाकरेंना खुर्चीवरुन खाली खेचले, असा पलटवार भगतसिंह कोश्यारी यांनी केला. 

भगतसिंह कोश्यारी महाराष्ट्राचे राज्यपाल असताना त्यांना मसुरी या ठिकाणी येथील एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जायचे होते. प्रोटोकॉलनुसार त्यांना सरकारी विमानाने जायचे होते. मात्र राज्य सरकारकडून संमती न मिळाल्याने भगतसिंह कोश्यारी यांना विमानातून उतरावे लागले होते. या घटनेचा धागा पकडून भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. 

उद्धव ठाकरे हे संत माणूस, ते कुठे राजकारणात आले?

उद्धव ठाकरे हे संत माणूस आहेत. ते कुठे राजकारणात आले? त्यांनी त्यांची संघटना व्यवस्थितपणे चालवायला हवी होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाच्या लायक नसताना त्यांना जबरदस्तीने तिकडे बसवण्यात आले. शरद पवारांसारखा मार्गदर्शकही उद्धव ठाकरेंना वाचवू शकला नाही. महाराष्ट्रात राज्यपाल असताना त्यांनी मला विमानातून उतरवले होते. आता नियतीने त्यांना खुर्चीवरून खाली उतरवले. मी त्यांना सत्तेतून खाली उतरवले नाही, अशी टीका भगतसिंह कोश्यारी यांनी केली. न्यूज १८ लोकमतच्या मुलाखतीत ते बोलत होते. 

दरम्यान, उद्धव ठाकरेंना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बळीचा बकरा बनवले. मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे कधीच योग्य नव्हते, त्यांनी पक्ष सांभाळायला हवा होता. मी देवापुढे प्रार्थना करतो आहे की त्यांनी या सगळ्यापासून लांब रहावे, असे भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीUddhav Thackerayउद्धव ठाकरेMahavikas Aghadiमहाविकास आघाडी