Video - तुफान राडा! जत्रा पाहायला आल्या अन् भिडल्या; एकमेकींच्या झिंज्या उपटल्या अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 17:02 IST2023-01-24T16:56:51+5:302023-01-24T17:02:26+5:30
सर्वजणी एकमेकींशी भांडू लागल्या. लाथाबुक्क्यांनी मारहाण करू लागल्या. एकमेकींचे केस ओढू लागल्या.

Video - तुफान राडा! जत्रा पाहायला आल्या अन् भिडल्या; एकमेकींच्या झिंज्या उपटल्या अन्...
बिहारच्या भागलपूरमध्ये डिस्नेलँड जत्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. लोक जत्रेचा आनंद लुटताना दिसत आहेत, मात्र या जत्रेचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मुलींच्या दोन गटांमध्ये जोरदार मारामारी सुरू आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. मुलींमध्ये तुफान राडा झाला. जत्रेमध्येच त्या एकमेकींना भिडल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भागलपूरच्या भीखनपूरमध्ये रेल्वेच्या जमिनीवर डिस्नेलँड जत्रा उभारण्यात आली आहे. शनिवारी संध्याकाळी डिस्नेलँडसमोर सुमारे 10 ते 12 मुली आपापसात बोलत होत्या. त्यानंतर अचानक सर्वजणी एकमेकींशी भांडू लागल्या. लाथाबुक्क्यांनी मारहाण करू लागल्या. एकमेकींचे केस ओढू लागल्या. याच दरम्यान जत्रेसाठी आलेले सर्व लोक मजा पाहत होते.
काही लोकांनी मुलींच्या भांडणाचा व्हिडीओ बनवायला सुरुवात केली, पण मुलींनी त्याची पर्वा न करता एकमेकींशी त्या भांडतच होत्या आणि केस ओढण्यात व्यस्त होत्या.याप्रकरणी सध्या कोणत्याही बाजूने गुन्हा दाखल करण्यात आलेला नसला तरी हा व्हिडीओ घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने बनवला असून तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"