शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

Bhabanipur By Election Result : भवानीपूरमध्ये ममतांचा मोठा विजय, 58 हजार मतांनी भाजपचा पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2021 14:39 IST

ममतांनी भाजपच्या प्रियंका टिब्रेवाल यांचा 58832 मतांनी पराभव केला. ममतांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेचा विषय बनली होती.

भवानीपूर - भवानीपूर - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भवानीपूर विधानसभा जागेसाठी झाले पोटनिवडणुकीत जबरदस्त विजय मिळविला आहे. ममतांनी भाजपच्या प्रियंका टिब्रेवाल यांचा 58832 मतांनी पराभव केला. ममतांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेचा विषय बनली होती. या पोट निवडणुकीत ममता बॅनर्जी यांना एकूण 84709 मतं मिळाली. तर भाजपच्या प्रियंका टिब्रेवाल यांना 26320 मतं मिळाली. तर सीपीएम उमेदवार श्रीजीब यांना केवळ 4201 मतेच मिळू शकली.

भाजप उमेदवार प्रियंका टिब्रेवाल यांनी आपला पराभव स्वीकारत म्हटले आहे, मी पराभव स्वीकार करते. पण, मी न्यायालयात जात नाही. ते लोक म्हणत होते, की ममता 1 लाख मतांनी जिंकतील. पण त्यांना जवळपास 50 हजार मते मिळाली आहेत. मी ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन करते. मात्र, त्यांनी ज्या पद्धतीने निवडणूक जिंकली, ते सर्वांनीच पाहिले आहे. ममतांचा केंद्रावर निशाणा, समर्थकांचे मानले आभार -भवानीपूरमधील विजयानंतर ममता बॅनर्जी लोकांना संबोधित करताना म्हणाल्या, या विजयासाठी मी सर्वांचे आभार मानते. ममता म्हणाल्या, भवानीपूरमध्ये 46 टक्के गैरबंगाली मतदार आहेत, प्रत्येकाने मला मतदान केले. यावेळी ममतांनी केंद्रावरही निशाणा साधला. एवढ्या लहानशा विधानसभा मतदारसंघासाठीही 3.5 हजार केंद्रीय दलाचे जवान तैनात करण्यात आले. आमच्या विरुद्ध षडयंत्र रचले गेले. त्यांनी नंदीग्राममध्ये झालेल्या पराभवाचा उल्लेख करत, हे प्रकरण सध्या न्यायालयात आहे, त्यामुळे त्यावर काहीही बोलणार नाही, पण इथे काय झाले, हे लोकांनी पाहिले आहे, असेही ममता म्हणाल्या.

पोटनिवडणुकीतील विजयानंतर जल्लोष करू नका, निवडणूक आयोगाचे ममता सरकारला निर्देश -पश्चिम बंगालमध्ये तीन विधानसभा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर होण्यापूर्वी निवडणूक आयोगाने राज्य सरकारला पत्र लिहून कोणत्याही प्रकारचा जल्लोष न करण्याचे निर्देश दिले आहेत. याच बरोबर, निकाल आल्यानंतर राज्यात कुठल्याही प्रकारचा हिंसाचार होऊ नये, यासाठी कडक उपाय योजना आखण्यात याव्यात, असे या पत्रात सांगण्यात आले आहे. तत्पूर्वी, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर राज्यात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. त्या घटनांसाठी भाजपने टीएमसी समर्थकांना जबाबदार धरले होते.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगाल