शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
2
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
3
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
6
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
7
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
8
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
9
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
10
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
11
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
12
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
13
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
14
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
15
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
16
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
17
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
18
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
19
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
20
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी

सावधान...५ पैकी एका पुरुषाला होतोय कॅन्सर, ७७% वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2024 10:28 IST

Cancer: भारतासह जगभरात कर्करोग (कॅन्सर) होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. २०२२ मध्ये भारतात १४.१ लाखांपेक्षा अधिक कॅन्सरग्रस्त आढळले असून, ९.१ लाखांपेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिनिव्हा/नवी दिल्ली : भारतासह जगभरात कर्करोग (कॅन्सर) होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. २०२२ मध्ये भारतात १४.१ लाखांपेक्षा अधिक कॅन्सरग्रस्त आढळले असून, ९.१ लाखांपेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतात स्तनाचा कॅन्सर होण्याचे प्रमाण सामान्य झाले आहे. २०५० पर्यंत कॅन्सर रुग्णांमध्ये ३.५ कोटींपर्यंत वाढ होण्याची भीती आहे. २०२२ मध्ये २ कोटी कॅन्सरग्रस्त आढळले असून, यात तब्बल ७७ टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

■ ओठाचा कॅन्सर, जबड्याचा कॅन्सर आणि फुफ्फुसाचा कर्करोग पुरुषांमध्ये सर्वात सामान्य आहे तर, स्तन आणि गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर स्त्रियांमध्ये सर्वाधिक आहे.■ स्तन कॅन्सरमध्ये २७ टक्के तर गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याचे प्रमाण १८ टक्क्यांनी वाढले आहे.■ कॅन्सरचे निदान झाल्यानंतर ५ वर्षाच्या आत जिवंत असलेल्या लोकांची संख्या भारतात जवळपास ३२.६ लाख होती.स्तन कॅन्सर वाढतोय- १०.६% कर्करोग होण्याचा धोका भारतात वाढला आहे.-७.२% कर्करोगामुळे मृत्यू होण्याचा धोका भारतात वाढला आहे.- २०% कर्करोग होण्याचे प्रमाण जगभरात वाढले आहे.- ९.६% कर्करोगाने मृत्यू होण्याचे प्रमाण जगभरात वाढले आहे.

योग्य उपचार मिळेनात, लवकर निदान होईना१८५ देशांचा अभ्यास यात करण्यात आला. यातील केवळ ३९ टक्के लोकांना कॅन्सरवर उपचार करताना योग्य पॅकेज मिळाले. तर २८ टक्के लोकांची अतिरिक्त्त कव्हर, वेदना कमी करण्यासाठी योग्य काळजी घेण्यात आली. लवकर निदान होत नसल्याने कॅन्सर रुग्णात वाढ होतेय.

तंबाखू घेतोय जीव आशियामध्ये तंबाखू फुफ्फुसाचा कर्करोग वाढण्याचे प्रमुख कारण आहे. स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात सामान्यपणे आढळणारा कॅन्सर आहे. जगात ७ टक्के मृत्यू हे स्तन कॅन्सरने होत आहेत. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा जागतिक स्तरावर आठव्या क्रमांकाचा सर्वात सामान्य कर्करोग आहे.

गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर...गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग सार्वजनिक आरोग्य समस्या निर्माण झाली असून, जगभरात यासाठी मोहीम सुरू झाली आहे. या अंतर्गत ९० टक्के मुलींना १५ वर्षे होण्याआधी ह्युमन पॅपिलोमा विषाणू (एचपीव्ही) लस टोचण्यात येत आहे.जगात किती वाढला कॅन्सर? जागतिक स्तरावर ९७ लाख कॅन्सरग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. ५ पैकी एका पुरुषाला कॅन्सर होत असून ९ पैकी १ पुरुष आणि १२ पैकी १ महिलेचा कॅन्सरमुळे मृत्यू होत आहे.

टॅग्स :cancerकर्करोगHealthआरोग्यIndiaभारत