सावधान! गेमिंग प्लॅटफॉर्मवरून सुरू आहे तुमच्या मुलांची ‘डिजिटल शिकार’; दहशतवादी संघटनांचा आता नवा डाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 09:53 IST2026-02-17T09:52:43+5:302026-02-17T09:53:32+5:30
११ ते १७ वयोगटातील मुलांवर या संघटनांची नजर असून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सनी सुरक्षा कडक केल्यामुळे दहशतवादी संघटनांनी आपला पवित्रा बदलला आहे.

सावधान! गेमिंग प्लॅटफॉर्मवरून सुरू आहे तुमच्या मुलांची ‘डिजिटल शिकार’; दहशतवादी संघटनांचा आता नवा डाव
नवी दिल्ली : मुलं तासन् तास मोबाइलवर गेम खेळत असतील, तर त्यांचे फक्त मनोरंजन होत नसून ते कदाचित मोठ्या धोक्याच्या उंबरठ्यावर असू शकतात. अमेरिकास्थित मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना व द्वेष पसरवणारे गट मुलांना जाळ्यात ओढण्यासाठी गेमिंग प्लॅटफॉर्मचा वापर करत आहेत.
११ ते १७ वयोगटातील मुलांवर या संघटनांची नजर असून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सनी सुरक्षा कडक केल्यामुळे दहशतवादी संघटनांनी आपला पवित्रा बदलला आहे.
अवघ्या जगाला जोडून जगाचा निरोप घेतला...; 'ग्रँडफादर ऑफ इंटरनेट' डेव्हिड जे. फार्बर यांचे निधन
‘रोब्लॉक्स’ व ‘माइंडक्राफ्ट’ सर्वात धोकादायक
आता दहशतवादी संघटनांनी ‘रोब्लॉक्स’, ‘माइंडक्राफ्ट’ आणि ‘डिस्कॉर्ड’ सारख्या लोकप्रिय गेमिंग प्लॅटफॉर्मवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. यामध्ये ‘सँडबॉक्स’ प्रकारचे गेम्स सर्वाधिक धोकादायक बनत आहेत.
दहशतवादी गट अशी रचताहेत ‘फनल स्ट्रॅटेजी’
मुलांना कट्टरपंथी बनवण्यासाठी दहशतवादी गट टप्प्याटप्प्याने काम करत आहेत.
टिकटॉक किंवा एक्स (ट्विटर) सारख्या प्लॅटफॉर्मवर मुलांना आकर्षित करण्यासाठी ‘कूल’ वाटणारे मीम्स वापरले जातात.
एकदा का मुलाने रस दाखवला, की त्याला गेममधील गुपित ‘मोड’ किंवा खासगी सर्व्हरवर बोलावले जाते.
अंतिम टप्प्यात, मुलाला ‘डिस्कॉर्ड’ सारख्या एनक्रिप्टेड प्लॅटफॉर्मवर नेऊन कट्टरपंथी विचारांची ट्रेनिंग दिली जाते.
मुलांना धोक्यापासून वाचवणे का कठीण जाते?
देखरेखीतील कमतरता : ‘रोब्लॉक्स’सारख्या गेम्समध्ये युजरने तयार केलेली सामग्री इतकी प्रचंड आहे की, स्वयंचलित सिस्टमद्वारे त्यावर नजर ठेवणे जवळपास अशक्य आहे. त्यामुळे मुलांना वाचवण्यात अनेक अडचणी येत आहेत
कायदेशीर अडथळे : संशयित व्यक्ती अल्पवयीन असल्यास त्यांच्यावर होणारी कायदेशीर कारवाई गुप्त ठेवली जाते, ज्यामुळे सामान्य जनता आणि इतर पालकांना या धोक्याची गंभीरताच समजत नाही.
पालकांनी काय आणि कशी काळजी घ्यावी?
स्क्रीन टाइम मर्यादित करा : मुले एकटी असताना तासन् तास गेम खेळणार नाहीत याची खात्री करा.
पॅरेंटल कंट्रोल वापरा : गेमिंग ॲप्समधील सुरक्षा सेटिंग्ज आणि चॅट फिल्टरचा वापर करा. कायम सतर्क राहा.
संवाद ठेवा : गेम खेळताना मुले अचानक काही ‘अनोळखी शब्द’ किंवा सांकेतिक कोडवर्ड्स वापरताना आढळल्यास तत्काळ सावध व्हा.