सावधान! ‘हेपॅटायटीसने राेज ३,५०० जणांचा होतोय मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 05:44 AM2024-04-11T05:44:45+5:302024-04-11T05:46:16+5:30

जागतिक आरोग्य संघटना: भारतात २०२२ मध्ये साडेतीन कोटींपेक्षा जास्त प्रकरणे

Beware! 3,500 people die every day due to hepatitis | सावधान! ‘हेपॅटायटीसने राेज ३,५०० जणांचा होतोय मृत्यू

सावधान! ‘हेपॅटायटीसने राेज ३,५०० जणांचा होतोय मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : संसर्गामुळे होणाऱ्या अनेक आजारांमध्ये ‘हेपॅटायटीस’ या आजाराचा समावेश होतो. या आजारातूनच काविळसारखा गंभीर आजार होऊ शकतो. २०२२ मध्ये भारतात हेपॅटायटीसची ३.५ कोटींपेक्षा जास्त प्रकरणे होती, जी त्यावर्षी जागतिक स्तरावर एकूण प्रकरणांपैकी ११.६ टक्के होती. आता हे प्रमाण चीनखालोखाल दुसऱ्याच क्रमांकावर आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या २०२४ च्या जागतिक हेपॅटायटीस अहवालात ही आकडेवारी देण्यात आली आहे. या रोगाचे प्रमुख लक्षण म्हणजे यकृताला सूज येणे. दरवर्षी सुमारे १३ लाख लोकांचा मृत्यू या आजाराने होतो, असे अहवालात 
म्हटले आहे.

आकडेवारी बोलते...
nभारतामध्ये २०२२ मध्ये २.९८ कोटी हेपॅटायटीस बी, हेपेटायटीस सी संसर्गाची संख्या ५५ लाख.
nभारतात २०२२ मध्ये ९८,३०५ लोक ‘हेपॅटायटीस बी’मुळे मरण पावले, तर २६,२०६ लोक ‘हेपेटायटीस सी’ने मरण पावले.

मृत्युंची संख्या २ लाखांनी वाढली
हेपॅटायटीसमुळे झालेल्या मृत्युंची अंदाजे संख्या २०१९ मध्ये ११ लाखांवरून २०२२ मध्ये १३ लाख झाली. जगभारत हेपॅटायटीस बी आणि सी संसर्गामुळे दररोज ३,५०० लोक मृत्युमुखी पडत आहेत.

देशातील संक्रमित लोकांपैकी केवळ २.४ टक्के लोकांचे वेळेवर निदान.

हिपॅटायटीस कारणे...
हेपॅटायटीस बी आणि सी असुरक्षित इंजेक्शन पद्धतींद्वारे आणि दूषित सीरिंज आणि सुया, संक्रमित रक्त आणि रक्त उत्पादने, लैंगिक संक्रमण, संक्रमित आईपासून बाळापर्यंत प्रसार होतो.

निदान होत नाही हेच मोठे कारण
हेपॅटायटीस संसर्ग रोखण्यात जागतिक स्तरावर प्रगती होऊनही मृत्यूदर मात्र वाढत आहे. कारण हेपॅटायटीस असलेल्या फारच कमी लोकांचे निदान आणि उपचार वेळेवर केले जातात, असे डब्ल्यूएचओचे महासंचालक डॉ. टेड्रोस ॲधानोम गेब्रेयसस यांनी एका निवेदनात 
म्हटले आहे.

Web Title: Beware! 3,500 people die every day due to hepatitis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.