प्रो-कबड्डी लीगच्या सामन्यांवर सट्टेबाजी

By Admin | Updated: February 22, 2016 14:06 IST2016-02-22T14:02:44+5:302016-02-22T14:06:33+5:30

प्रो कबड्डी लीग स्पर्धेतील सामन्यांवर सट्टेबाजी केल्याच्या आरोपाखाली आंध्रप्रदेश पोलिसांनी क्रिष्णा जिल्ह्यातील उतुकुरु गावातून १७ जणांना अटक केली आहे.

Betting on pro-kabaddi league matches | प्रो-कबड्डी लीगच्या सामन्यांवर सट्टेबाजी

प्रो-कबड्डी लीगच्या सामन्यांवर सट्टेबाजी

ऑनलाइन लोकमत 

हैदराबाद, दि. २२ - सध्या सुरु असलेल्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेतील सामन्यांवर सट्टेबाजी केल्याच्या आरोपाखाली आंध्रप्रदेश पोलिसांनी क्रिष्णा जिल्ह्यातील उतुकुरु गावातून १७ जणांना अटक केली आहे. 
मिळालेल्या माहितीच्या आधाराव पोलिस उपनिरिक्षक एम. लक्ष्मण यांच्या नेतृत्वाखाली पथकाने गावातील एका दुकानावर छापा मारला आणि तिथे सट्टेबाजी करणा-या १७ गावक-यांना अटक केली. पोलिसांनी तिथून दहा हजार रुपये आणि मोबाईल फोन्स जप्त केले. 
प्रो कबड्डी लीग स्पर्धा मोठया प्रमाणावर लोकप्रिय ठरली आहे. आयपीएल क्रिकेट सामन्यांनंतर मोठया प्रमाणावर प्रेक्षकवर्ग या स्पर्धेला मिळत आहे. 

Web Title: Betting on pro-kabaddi league matches