मॅट्रीमोनी वेबसाईट्सच्या माध्यमातून महिलांना फसवणारा भामटा गजाआड
By Admin | Updated: August 9, 2014 15:17 IST2014-08-09T15:17:59+5:302014-08-09T15:17:59+5:30
शादी डॉट कॉम, जीवनसाथी डॉट कॉम व भारती मॅट्रीमॉनी डॉट कॉम सारख्या वेबसाईट्सच्या माध्यमातून महिलांना जाळ्यात अडकवून फसवणा-या भामट्याला दिल्ली पोलीसांनी अटक केली आहे.

मॅट्रीमोनी वेबसाईट्सच्या माध्यमातून महिलांना फसवणारा भामटा गजाआड
>ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ९ - शादी डॉट कॉम, जीवनसाथी डॉट कॉम व भारती मॅट्रीमॉनी डॉट कॉम सारख्या वेबसाईट्सच्या माध्यमातून महिलांना जाळ्यात अडकवून फसवणा-या भामट्याला दिल्ली पोलीसांनी अटक केली आहे. अशा साईट्सवर वरुण पाल हा ३० वर्षांचा तरूण वेगवेगळ्या नावांनी सदस्य व्हायचा. महिलांना व त्यातही घटस्फोटित महिलांशी संपर्क साधून त्यांच्याशी जवळिक साधायचा. अनेकवेळा त्यांच्याशी फोनवर संभाषण करायचा आणि आपल्या व्यवसायाविषयी खोटी माहिती द्यायचा. काही वेळा त्याच्यात जाळ्यात अडकलेल्या मुली त्याच्या सांगण्यावरुन त्याला स्वताची नग्न छायाचित्रे द्यायचा तर काही वेळा पाल काही महिलांची नग्न छायाचित्रे त्यांच्या नकळत घ्यायचा.
त्याने काही महिलांना आपण लग्न करणार असल्याचे सांगत व्यावसायिक गरजेपोटी पैशाची मागणी केली तर काही महिलांना त्याने त्यांची नग्न छायाचित्रे दाखवून ब्लॅकमेल केले. मात्र, एका महिलेने पालला पैसे दिल्यानंतर फसल्याचे लक्षात आल्यावर पोलीसांत तक्रार दाखल केली. पोलीसांनी त्याचा माग काढत त्याला अटक केली आणि त्याने अशाप्रकारे अनेक महिलांना फसवल्याचे समोर आले आहे. दिल्ली विद्यापीठात अर्धवट शिक्षण झालेल्या पालने याआधी न्यूज चॅनेलमध्ये व कॉल सेंटरमध्ये काम केल्याचे पोलीसांनी सांगितले. इंटरनेटच्या माध्यमातून संपर्कात आलेल्या अपरिचित व्यक्तिंपासून सावध राहण्याचे आवाहन पोलीसांनी केले असून उघडकीस न आलेले असे असंख्य प्रकार घडले असण्याची शक्यता व्यक्त केली.