शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

'विश्वासघात दिवस'; मोदी सरकारच्या चौथ्या वर्षपूर्तीनिमित्त काँग्रेसचं आगळं सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2018 13:33 IST

26 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे. याच निमित्तानं काँग्रेस विश्वासघात दिवस साजरा करणार आहे.

पाटणा- 26 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे. याच निमित्तानं काँग्रेस विश्वासघात दिवस साजरा करणार आहे. नरेंद्र मोदी सरकारचा 26 मे 2018 रोजी स्वतःच्या चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याचं औचित्य साधून काँग्रेसनं विश्वासघात दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.याच दिवशी काँग्रेस पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या खोट्या आश्वासनांचा पर्दाफाश करणार आहे. तसेच मोदींनी या चार वर्षांत लोकांना खोटी आश्वासनं देऊन कशा प्रकारे फसवणूक केली हेसुद्धा उघड करण्याचा निर्धार केला आहे. शनिवारी सर्व राज्यांतील राजधानी आणि जिल्हा स्तरावर हे विरोध प्रदर्शन केलं जाणार आहे. या विरोध प्रदर्शनात भाजपाला महागाईच्या मुद्द्यावरून घेरण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. मोदींनी चार वर्षांना लोकांना खोट्या आश्वासनांशिवाय काहीही दिलेलं नाही, अशी टीका बिहार काँग्रेसचे प्रभारी कौकब कादरी यांनी केली आहे.  

गेल्या काही दिवसांपूर्वी सत्तेवर येण्यासाठी मोदींनी खोटी आश्वासने दिल्याची खंत अनेकांनी बोलून दाखवली होती. मोदी सरकार 2014मध्ये सत्तेवर आले. पण राम मंदिर बांधण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत. त्यांना यावरून फक्त सत्तेची लालसा असल्याचे दिसते. हिंदू राष्ट्र त्यांना नकोच आहे. देशातील हिंदूंची फसवणूक झाली, असे सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक म्हणाले होते. मोदी सरकार जम्मू-काश्मीरमधील तिढा, काश्मीर पंडितांचे प्रश्न अशा विविध मुद्द्यांवर तोडगा काढेल अशी हिंदुत्ववादी संघटनांना आशा होती. पण जम्मूत पीडीपीसोबत भाजपने युती केली आणि तिथेही भाजपला फक्त सत्ताच हवी असल्याचे दिसते, असे हिंदुत्ववादी संघटनांचे म्हणणे आहे. आमचे सरकार केंद्रात असल्याचे वाटत नाही. राम मंदिराचे काम सुरू झाले असते तर भारताला हिंदूराष्ट्र म्हणता आले असते. हिंदू राष्ट्रांमध्ये अन्य धर्मांना स्थान नाही. आमच्यासाठी हिंदू धर्मच महत्त्वाचा आहे, असे साध्वी सरस्वती यांनी सांगितले.

टॅग्स :Indian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा