बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) च्या आयपीएल विजयाच्या सेलिब्रेशन दरम्यान चेंगराचेंगरी झाली. यामध्ये ११ जणांना आपला जीव गमवावा लागला आणि ४७ जण जखमी झाले. चेंगराचेंगरीत जीव गमावलेल्या २१ वर्षीय भौमिक लक्ष्मणचे वडील बीटी लक्ष्मण यांचा मन हेलावून टाकणारा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये बीटी लक्ष्मण आपल्या मुलाच्या कबरीला मिठी मारून रडताना दिसत आहेत.
"माझ्या मुलासोबत जे काही घडलं ते इतर कोणासोबतही घडू नये, मला आता दुसरीकडे कुठेही जायचं नाही, मलाही इथेच राहायचं आहे. मी पाहत असलेला असा दिवस कोणत्याही वडिलांना पाहायला लागू नये" असं व्हिडिओमध्ये बीटी लक्ष्मण म्हणत आहेत. याच दरम्यान दोन लोक त्यांना उचलण्याचा प्रयत्न करतात, पण वडील ढसाढसा रडताना दिसत आहेत.
"दिव्यांशीला विराट कोहलीला पाहायचं होतं..."; आईने सांगितलं चेंगराचेंगरीच्या वेळी काय घडलं?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, भौमिक लक्ष्मण हा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी होता आणि तो त्याच्या मित्रांसह स्टेडियमबाहेर होणाऱ्या विजयी मिरवणुकीत सामील होण्यासाठी आला होता. याच दरम्यान चेंगराचेंगरी झाली आणि मुलाचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. आरसीबीचे मार्केटिंग हेड निखिल सोसले यांच्यासह चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
"मुलाच्या मृतदेहाचे तुकडे करू नका..."; चेंगराचेंगरीत गमावला एकुलता एक मुलगा, वडिलांचा टाहो
“मी त्याला खूप प्रेमाने वाढवलं, आता तो सोडून गेला”; पाणीपुरीवाल्याच्या लेकाचा चेंगराचेंगरीत मृत्यू
चेंगराचेंगरी प्रकरणाचे उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश कर्नाटक सरकारने दिले आहेत. त्याशिवाय कर्नाटक सरकारने या प्रकरणी निष्काळजीपणाचा ठपका ठेवत पोलीस आयुक्तांसह इतर बड्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबन करण्याची मोठी कारवाई केली आहे. बंगळुरूतील दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी न्या. माइकल कुन्नाह यांच्या नेतृत्वावाली तपास आयोग स्थापन केला आहे.